मालामाल झाली मलायका! कधी काळी घेतलेलं अंधेरीतील घर इतक्या कोटींना विकलं, तब्बल ६२ टक्के मिळवला नफा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 12:55 IST2025-09-09T12:54:57+5:302025-09-09T12:55:33+5:30
मलायकाने नुकतंच मुंबईतील तिचं एक घर विकलं आहे. हे घर विकून अभिनेत्रीने कोटी रुपयांचा फायदा करून घेत तब्बल ६२ टक्के नफा मिळवला आहे.

मालामाल झाली मलायका! कधी काळी घेतलेलं अंधेरीतील घर इतक्या कोटींना विकलं, तब्बल ६२ टक्के मिळवला नफा
मलायका अरोरा ही बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे. मलायका तिच्या पर्सनल आयुष्याबाबत कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. आता मलायका चर्चेत आली आहे ती तिच्या एका प्रॉपर्टीमुळे. मलायकाने नुकतंच मुंबईतील तिचं एक घर विकलं आहे. हे घर विकून अभिनेत्रीने कोटी रुपयांचा फायदा करून घेत तब्बल ६२ टक्के नफा मिळवला आहे.
स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईच्या मायानगरीत अनेक सेलिब्रिटींची घरं आहेत. मुंबईतील प्राइम लोकेशन असलेल्या भागात मलायका सध्या राहते. तर अभिनेत्रीचं अंधेरी येथेदेखील एक अपार्टमेंट होतं. मलायकाने ७ वर्षांपूर्वी २०१८ सालीअंधेरी पश्चिम येथील एका कॉम्प्लेक्समध्ये ३.२६ कोटी रुपयांना एक फ्लॅट खरेदी केला आहे. आता हा फ्लॅट मलायकाने विकला आहे. या व्यवहारात अभिनेत्रीला तब्बल ६२ टक्क्यांचा नफा झाला आहे. हा फ्लॅट विकल्यानंतर मलायकाला २ कोटींचा फायदा झाला आहे. या फ्लॅटची किंमत विकल्यानंतर मलायकाला ५.३० कोटी इतकी मिळाली आहे.
दरम्यान, मलायका ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अभिनेत्री तिच्या लव्ह लाइफमुळे प्रचंड चर्चेत होती. मलायकाने १९९८ मध्ये अरबाजशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर १९ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यानंतर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मलायका बॉलिवूडमधील एक लोकप्रिय नाव आहे. अनेक आयटम साँगमध्ये ती दिसली. जवळपास १०० कोटींची ती मालकीण आहे.