Malaika Arora Arjun Kapoor : 'मर्द आहे तो, शाळेत जाणारा..'; अर्जुनसोबतच्या नात्यावर मलायकाचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 09:02 AM2022-12-09T09:02:05+5:302022-12-09T09:03:34+5:30

मी सगळ्यांना सांगू इच्छिते मी त्याचे आयुष्य खराब करत नाहीए. तो काही शाळेत जाणारा मुलगा नाही की ज्याला अभ्यासावर लक्ष द्यायचे आहे.

malaika-arora-says-mard-hai-wo-on-her-relationship-with-arjun-kapoor | Malaika Arora Arjun Kapoor : 'मर्द आहे तो, शाळेत जाणारा..'; अर्जुनसोबतच्या नात्यावर मलायकाचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Malaika Arora Arjun Kapoor : 'मर्द आहे तो, शाळेत जाणारा..'; अर्जुनसोबतच्या नात्यावर मलायकाचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

googlenewsNext

'मूव्हिंग विथ मलायका' (Moving in with Malaika) या नव्या शोमध्ये मलायका अरोरा वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करत आहे. आता तिचे वैयक्तिक आयुष्य म्हणजे वयाने लहान असणाऱ्या अर्जुन कपूरसोबत तिची रिलेशनशिप (Relationship). नुकत्यात रिलीज झालेल्या एपिसोडमध्ये तर मलायका स्टॅंडअप कॉमेडियन बनली आहे. ट्रोल करणाऱ्यांना तिने यातुन सडेतोड उत्तरं दिलीएत.

अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाली मलायका?

'मूव्हिंग विथ मलायका'च्या चौथ्या एपिसोडमध्ये मलायकाने स्टॅंडअप कॉमेडी (standup comedy) केली. तिच्या चालण्याच्या स्टाईलवर, अर्जुनसोबतच्या नात्यावर, घटस्फोटावर ट्रोल करणाऱ्यांना तिने उत्तर दिले आहे. तिने बहिण अमृता अरोरा आणि मैत्रिण अनुषा दांडेकर यांनाही ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. अर्जुन सोबतच्या नात्यावर ती म्हणाली, ' मी अर्जुनचे आयुष्य खराब करत नाही. मी वयाने मोठी आहे तर आणि लहान वयाच्या मुलाला डेट करत आहे. मी त्याचे आयुष्य खराब करत आहे. बरोबर ना ? मी सगळ्यांना सांगू इच्छिते मी त्याचे आयुष्य खराब करत नाहीए. तो काही शाळेत जाणारा मुलगा नाही की ज्याला अभ्यासावर लक्ष द्यायचे आहे. जेव्हा आम्ही बाहेर भेटतो तेव्हा असे नाही की तो त्याचा क्लास बुडवुन येतो. असंही नाही की तो पोकेमॉन पकडत असताना मी त्याच्या मागे मागे जाते.'

ती पुढे म्हणाली, 'सुदैवाने तो मोठा झाला आहे, मर्द आहे तो. आम्ही दोघे समजुतदार आहोत. एकमेकांसाबत राहू शकतो. जर एखादा पुरुष कमी वयाच्या मुलीसोबत डेट करत असेल तर तो प्लेयर आणि महिला कमी वयाच्या पुरुषाला डेट करत असेल तर ती (Cougar) कुगर ? हे बरोबर नाही.'

मलायकाच्या या स्टॅंडअप कॉमेडीसाठी अर्जुनला उपस्थित राहता आले नाही. परंतु अर्जुनने त्याच्या लेडी लव्हसाठी व्हिडिओ मेसेज पाठवला होता. त्याने मलायका प्रोत्साहन दिले, कौतुक केले. हा शो सध्या अनेक लोक पसंत करत आहेत. 

Web Title: malaika-arora-says-mard-hai-wo-on-her-relationship-with-arjun-kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.