'तेव्हाच मी अरबाजला घटस्फोट द्यायचं ठरवलं'; मलायका अरोरानं अखेर सांगितला 'त्या' रात्रीचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 20:30 IST2022-02-28T20:29:20+5:302022-02-28T20:30:42+5:30
बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडल मलायका अरोरा तिच्या जबरदस्त लूकमुळे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसंच बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या फोटोंचीही नेहमीच चर्चा होत असते. मलायका आणि अरबाज खान यांनी २०१७ साली घटस्फोट घेतल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता.

'तेव्हाच मी अरबाजला घटस्फोट द्यायचं ठरवलं'; मलायका अरोरानं अखेर सांगितला 'त्या' रात्रीचा किस्सा
बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडल मलायका अरोरा तिच्या जबरदस्त लूकमुळे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसंच बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या फोटोंचीही नेहमीच चर्चा होत असते. मलायका आणि अरबाज खान यांनी २०१७ साली घटस्फोट घेतल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. कारण मलायका आणि अरबाज त्यांच्यातील गोड व प्रेमळ नात्यामुळे नेहमीच 'परफेक्ट कपल' म्हणून समजले जायचे. मलायका अरोराने करीना कपूरच्या चॅट शोमध्ये तिच्या घटस्फोटासंबंधी काही गोष्टी सांगितल्या होत्या.
आपल्या कुटुंबानं अरबाजपासून वेगळं होण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता, असं मलायकानं तिची जिवलग मैत्रिण करीनाशी बोलताना खुलासा केला होता. "आम्ही प्रत्येक साधक-बाधक गोष्टींचा विचार केला आणि वेगळे होण्याचा निर्णय घेऊन पुढे जायचे असे ठरवले होते. कारण आम्हा दोघांच्याही आयुष्यात अशी परिस्थिती होती जी एकमेकांना दुःखी करत होती आणि आपल्या जीवनातील आजूबाजूच्या लोकांनाही याचा त्रास होत होता", असं मलायका म्हणाली.
घटस्फोट घेण्याच्या आदल्या रात्री मलायकाच्या कुटुंबीयांनी तिला तिच्या निर्णयाबद्दल खात्री आहे का असं विचारलं होतं. "तुम्हाला योग्य दिशेने जाण्यासाठी कोणीही प्रोत्साहन देत नाही. घटस्फोटाच्या आदल्या रात्री कुटुंबीय माझ्यासमोर होते आणि मला विचारण्यात आलं की तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल खात्री आहे का? मी हे अनेकदा ऐकलं आहे आणि कदाचित हेच लोक आहेत ज्यांना तुमची काळजी असते. पण आमचा निर्णय झाला होता", असं मलायका म्हणाली.