सावत्र वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायका अरोराची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाली, "त्यांचं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 12:41 IST2024-11-13T12:40:35+5:302024-11-13T12:41:22+5:30

सप्टेंबर महिन्यात मलायकाचे सावत्र वडील अनिल मेहता यांनी इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली.

Malaika Arora reacts for the first time after her stepfather s suicide | सावत्र वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायका अरोराची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाली, "त्यांचं..."

सावत्र वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायका अरोराची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाली, "त्यांचं..."

फॅशन आणि फिटनेस आयकॉन मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्या सावत्र वडिलांनी आत्महत्या केली. यामुळे तिच्या कुटुंबाला धक्का बसला. त्यातच मलायका ब्रेकअपच्या काळातून जात आहे. अर्जुन कपूरसोबत नातं तुटल्याने ती यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान नुकतंच मलायकाने घडलेल्या घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

सप्टेंबर महिन्यात मलायकाचे सावत्र वडील अनिल मेहता यांनी इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली. मलायका तेव्हा पुण्याला निघाली होती. बातमी कळताच ती तातडीने माघारी आली. मलायकाच्या आईला याचा जबर धक्का बसला. आता इतक्या महिन्यांनी मलायकाने पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "हा काळ माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी खूप कठीण आहे. या दु:खातून सावरायला वेळ लागेल. पण काहीही झालं तरी सर्वांनी आयुष्यात पुढे गेलंच पाहिजे. माझ्या वडिलांचंही हेच म्हणणं होतं. त्यामुळेही मी तसंच करत आहे. हे अजिबातच सोपं नाही. सगळं काही ठीक होण्यासाठी काही काळाचा अवधी लागेल."

ती पुढे म्हणाली, "आता मी पुन्हा कामावर लक्ष देत आहे. मानसिक आणि शारिरीकरित्या स्ट्राँग व्हावं लागेल जेणेकरुन माझं कुटुंबही सावरेल. मी संलग्न असलेल्या ब्रँड्ससोबत काम करण्यासाठी आतुर आहे. यावेळी मी एक खास प्रोजेक्ट करत आहे ज्याची घोषणा लवकरच करेन. माझ्या वडिलांसाठी हा प्रोजेक्ट समर्पित असेल."

मलायका अनेक ब्रँड्सची जाहिरात करते. फॅशन, लक्झरी बॅग्स, ब्युटी, रिअल इस्टेट यांच्या जाहिराती तिने केल्या आहेत. बऱ्याच काळापासून मलायका स्क्रीनवर दिसलेली नाही. दरम्यान नुकतंच तिने 'येक नंबर'या मराठी सिनेमात आयटम साँग केलं.

Web Title: Malaika Arora reacts for the first time after her stepfather s suicide