मलायकाच्या या दिलखेचक अदा करतील तुम्हाला घायाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 12:59 IST2018-08-23T12:57:26+5:302018-08-23T12:59:33+5:30
मलायका अरोरा बॉलिवूडमधील एक असं नाव जे कुणाला माहीत नाही असं नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे सिनेमात केवळ एक आयटम नंबर करुन तिने आपल्या मदहोश अदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.

मलायकाच्या या दिलखेचक अदा करतील तुम्हाला घायाळ!
मलायका अरोराबॉलिवूडमधील एक असं नाव जे कुणाला माहीत नाही असं नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे सिनेमात केवळ एक आयटम नंबर करुन तिने आपल्या मदहोश अदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. आपल्या हॉट फिरगमुळ आणि दिलखेचक अदांमुळे ती सोशल मीडियात नेहमी चर्चेत असते. तिचे फोटो सतत व्हायरल होत असतात. आज याच मलायकाचा ४५वा वाढदिवस. त्यानिमित्त बघुया तिचे काही खास फोटो.....
मलायकाने अरबाजपासून घटस्फोट घेतला असून आता ती सिंगल आहे. वेगवेगळ्या फॅशन शोजमध्ये ती आपली जादू चालवत चाहत्यांना घायाळ करत असते.
मलायकाच्या फिटनेसमुळेही तिच्या अनेक चाहत्यांना तिच्यासारखी फिगर मिळवण्याची हौस निर्माण झाली आहे. त्यामुळे तिचे फिटनेस व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत असतात.
मलायका आज बॉलिवूडच्या टॉप आयटम डान्सरपैकी एक आहे. आता ती 'पटाका' या विशाल भारद्वाज यांच्या सिनेमातही एक धमाकेदार आयटम नंबर करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या या गाण्याची उत्सुकता वाढली आहे.