Malaika Aarora : 'माझा घटस्फोट होत असताना तू गोव्यात...'; अरोरा बहिणींमधील वाद चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 15:22 IST2022-12-30T15:18:10+5:302022-12-30T15:22:56+5:30
बॉलिवुड अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिची बहिण अमृता अरोरा यांच्यातील नाते कसे आहे हे सध्या उघड उघड सर्वांसमोर येत आहे. 'मूव्हिंग इन विथ मलायका' या मलायकाच्या शो मध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होतोय.

Malaika Aarora : 'माझा घटस्फोट होत असताना तू गोव्यात...'; अरोरा बहिणींमधील वाद चव्हाट्यावर
बॉलिवुड अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिची बहिण अमृता अरोरा यांच्यातील नाते कसे आहे हे सध्या उघड उघड सर्वांसमोर येत आहे. 'मूव्हिंग इन विथ मलायका' या मलायकाच्या शो मध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होतोय. मलायकाचा घटस्फोट, अर्जुन कपूरसोबतचे नाते, मुलगा अरहानसोबतचे नाते या सर्व गोष्टींबद्दल मलायका शो मध्ये बोलली आहे. आता नुकतेच मलायकाचा घटस्फोट होत असताना बहिण अमृता अरोरा कुठे होती याचा खुलासा झाला आहे.
मलायकाचा मोठा खुलासा
'मूव्हिंग इन विथ मलायका' चा शेवटचा एपिसोड नुकताच प्रसारित झाला. यामध्ये मलायका आणि अमृता दोघी बहिणी जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. सगळं नीट सुरु असताना मध्येच अमृताने मलायकाला विचारले,'आयुष्यात कठीण प्रसंगी तुझ्याजवळचे लोक अपयशी ठरले असं तु फराह खान सोबतच्या पहिल्या एपिसोडमध्ये का म्हणाली ?' यावर मलायका भावूक झाली.
मलायका म्हणाली, 'अरबाजसोबत जेव्हा माझा घटस्फोट सुरु होता तेव्हा तु माझ्यासोबत नव्हती. २०१७ मध्ये आमचा घटस्फोट झाला. तो माझ्यासाठी खूप नाजूक क्षण होता. घटस्फोट झाला आणि मी आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. तो असा काळ होता जेव्हा मला तुझी सर्वात जास्त गरज होती. मला जजमेंट नको होतं, उपदेश नको होते, फक्त साथ हवी होती. तू माझ्यासोबत हवी होतीस असं मला वाटत होतं, तू मला म्हणावं, मल्ला, काळजी करु नको. मी तुझ्यासोबत उभी आहे. आजही आणि उद्याही. पण तु नव्हती. तू तर मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेली.'
मलायकाचे हे बोलणे ऐकून अमृताला धक्काच बसला. अमृता म्हणाली, 'तुझ्या मनात माझ्याबद्दल इतक्या तक्रारी आहेत हे मला माहित नव्हते.'
मलायका म्हणाली, 'अमृता, तू एक आई, पत्नी, मैत्रिण आणि मुलगी म्हणून उत्तम आहेस पण तू कधी चांगली बहिण होणार?'
आहे मी वयाने त्याच्याहून मोठी.. मग? बाईलाच कायम दोष का देता, मलायका अरोराचा सवाल..
मूव्हिंग इन विथ मलायका या शोमधून मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना अगदीच जवळून जाणून घेता आले. मलायकाने आजपर्यंत झालेल्या ट्रोलिंगलाही या शोच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.