मलायकाच्या बिकिनी फोटोवर अर्जुन कपूर नाराज? अभिनेत्याच्या कमेंटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 19:43 IST2022-02-08T19:43:02+5:302022-02-08T19:43:43+5:30
Arjun kapoor: सोशल मीडियावर सक्रीय असलेली ही जोडी अनेकदा त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात. यात बहुतेकदा ते एकमेकांच्या पोस्टवरही कमेंट करतात.

मलायकाच्या बिकिनी फोटोवर अर्जुन कपूर नाराज? अभिनेत्याच्या कमेंटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
सध्या बी टाऊनमध्ये म्हणजेच बॉलिवूडमध्येमलायका अरोरा (malaika arora )आणि अर्जुन कपूर (arjun kapoor) या जोडीची जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांनी त्यांचं नातं जाहीरपणे मान्य केल्यानंतर सातत्याने ही जोडी चर्चेत येत आहे. बऱ्याचदा जाहीरपणे एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करणारी ही जोडी जाहीररित्या एकमेकांची खिल्लीदेखील उडवत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या या दोघांचा असाच एक किस्सा चर्चेत येत आहे.यात मलायकाच्या बिकिनी फोटोवर अर्जुनने कमेंट केली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली ही जोडी अनेकदा त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात. यात बहुतेकदा ते एकमेकांच्या पोस्टवरही कमेंट करतात. यावेळी अर्जुनने मलायकाच्या बिकिनी फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अलिकडेच मलायकाने इन्स्टाग्रामवर तिचा एक बिकिनीमधील फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने संडे सनी साइड अप.., असं कॅप्शन दिलं होतं. हे कॅप्शन वाचल्यावर अर्जुनने भन्नाट कमेंट केली आहे. ही कमेंट वाचल्यावर अर्जुनला राग आलाय की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. मात्र, यावर मलायकाने उत्तर देत हा मजेचा भाग असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, मलायकाचा फोटो पाहिल्यावर अर्जुनने 'चांगलं कॅप्शन आहे', अशी कमेंट केली आहे. या कमेंटमागील अर्थ मलायकाला समजल्यानंतर 'हाहाहा..कॅप्शन चोर', असं प्रत्युत्तर तिने दिलं आहे. सध्या अर्जुन त्याच्या आगामी 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटामध्ये बिझी आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी, जॉन अब्राहम आणि तारा सुतारियादेखील झळकणार आहेत.