मलायका अरोरा @ ५०; दणक्यात साजरा झाला वाढदिवस! बर्थडे पार्टीचा व्हिडीओ पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 15:33 IST2025-10-24T15:32:25+5:302025-10-24T15:33:43+5:30
मलायका अरोराने तिचा ५० वा वाढदिवस साजरा केला.

मलायका अरोरा @ ५०; दणक्यात साजरा झाला वाढदिवस! बर्थडे पार्टीचा व्हिडीओ पाहिला का?
वय हा फक्त जिच्यासाठी एका आकडा आहे अशी बॉलिवूडची 'फॅशन आयकॉन' म्हणजे मलायका अरोरा. बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाणारी मलायका अरोरा तिच्या टोन्ड बॉडी आणि अॅक्टिव्ह लाईफस्टाईलमुळे कायमच चर्चेत असते. मलायकाची सुंदरता पाहून तर प्रत्येकजण थक्क होतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण मलायका आता ५० वर्षांची झाली आहे. मलायका अरोरा हिने काल २३ ऑक्टोबर रोजी आपला ५० वा वाढदिवस कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत मोठ्या थाटामाटात साजरा केला. या ग्लॅमरस सेलिब्रेशनची झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मलायकाच्या वाढदिवसाच्या पार्टीला तिची बहीण अमृता अरोरासह इंडस्ट्रीतील इतर मित्र उपस्थित होते. मलायकाने स्वतः इंस्टाग्रामवर या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे, तिचा मुलगा अरहान खान देखील तिच्यासोबत दिसला. मलायका गुलाबी ड्रेसमध्ये तिच्या मुलासोबत केकसमोर उभी असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे, या फोटोने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

मलायका अरोराच्या या खास दिवशी तिचे मित्र आणि चाहते यांनी तिला शुभेच्छा दिल्या. दिग्दर्शक करण जोहरने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या. करण जोहरने मलायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हटले की, "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मलायका अरोरा. मोठ्या मनाच्या , सुंदर आत्म्याच्या आणि मित्रांचा मित्र असलेल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!! आपल्या खूप आठवणी आहेत मल्ला.... आणि अजून खूप आठवणी तयार करायच्या आहेत... तुझे येणारे दशक खूप छान जावो!!!!" यावर मलायकानेही प्रेमाने उत्तर दिले, "करण, मी तुझ्यावर प्रेम करते". तर जिवलग मैत्रीण करीना कपूर खाननेही शुभेच्छा देताना लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय मल्ला. गोल्डन गर्ल, गोल्डन बर्थडे...लव्ह यू...".
मलायकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतंच 'थामा' चित्रपटातील 'पॉइझन बेबी' या गाण्यात थिरकताना दिसली. तसेच सध्या ती 'इंडियाज गॉट टॅलेंट' या नव्या सीझनमध्ये जज म्हणूनही दिसत आहे. या शोमध्ये ती नवज्योत सिंग सिद्धू आणि शान यांच्यासोबत जजची भूमिका साकारत आहे.