भूमी पेडणेकर-अर्जुन कपूर यांच्या 'मेरे हसबंड की बिवी'च्या सेटवर मोठी दुर्घटना; छत कोसळलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:00 IST2025-01-18T10:00:19+5:302025-01-18T10:00:45+5:30
या दुर्घटनेत कलाकार, क्रू मेंबर्स आणि अन्य काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याचं समोर येतंय

भूमी पेडणेकर-अर्जुन कपूर यांच्या 'मेरे हसबंड की बिवी'च्या सेटवर मोठी दुर्घटना; छत कोसळलं अन्...
बॉलिवू़ड मनोरंजन विश्वातून मोठी बातमी समोर येतेय. ती म्हणजे 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमाच्या सेटवर शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना झालीय. सिनेमाच्या सेटवर अचानक छत कोसळल्याने घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. यावेळी सेटवर अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, जॅकी भगनानी आणि सिनेमाचे दिग्दर्शक मुदस्सर अजीज उपस्थित होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणाला गंभीर दुखापत झाली नाहीये.
अर्जुन कपूर-भूमी पेडणेकरच्या सेटवर दुर्घटना
मुंबई येथील रॉयल पाम्स इंपेरिअल पॅलेसमध्ये 'मेरे हसबंड की बिवी' सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी सिनेमाच्या सेटवर अचानक छत कोसळलं. शूटिंगदरम्यान मोठा आवाज झाल्याने छत कोसळल्याची ही दुर्घटना घडली. यामुळे अर्जुन, भूमी, जॅकी आणि दिग्दर्शक मुदस्सर यांना किरकोळ जखम झाल्याचं पाहायला मिळतंय. अनेक दिवसांपासून मोठ्या आवाजात इथे शूटिंग होत असल्याने ही दुर्घटना घडली असल्याचं बोललं जातंय.
नेमकं काय झालं?
'मेरे हसबंड की बिवी' या सिनेमाच्या गाण्याचं शूटिंग सुरु होतं. पहिल्या दिवशी शूटिंग व्यवस्थित झालं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता एका सीनच्या शूटिंगदरम्यान छत अचानक कोसळलं. सेटवरच्या छतचे तुकडे कोसळल्याने वेळीच सर्वांनी बचाव केला. जर संपूर्ण छत कोसळलं असतं तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु तरीही अनेकांना दुखापत झाली. हा सिनेमा २१ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होणार आहे.