माहिरा खानने नाही बजावला मतदानाचा हक्क! आता मागितली माफी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 10:28 AM2018-07-27T10:28:43+5:302018-07-27T10:28:52+5:30

आता माहिरा पुन्हा चर्चेत आली आहे. चर्चेत म्हणण्यापेक्षा वादात सापडली आहे. 

mahira khan missed pakistan election apologises for for this | माहिरा खानने नाही बजावला मतदानाचा हक्क! आता मागितली माफी!!

माहिरा खानने नाही बजावला मतदानाचा हक्क! आता मागितली माफी!!

googlenewsNext

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान शाहरूख खानसोबत ‘रईस’मध्ये दिसली. यानंतर रणबीर कपूरसोबतचे न्यूयॉर्कच्या रस्त्यावरचे तिचे फोटो व्हायरल झालेत आणि ती चर्चेत आली. आता माहिरा पुन्हा चर्चेत आली आहे. चर्चेत म्हणण्यापेक्षा वादात सापडली आहे. होय, पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत मतदान न केल्यामुळे माहिराला ट्रोल व्हावे लागतेय.
माहिरा या निवडणुकीत मतदान करू शकली नाही. बुधवारी मतदानाच्या दिवशी तिने आपल्या मुलासोबतचा फोटो पोस्ट केला. हा फोटो पाकिस्तानातील नव्हता. या फोटोवरून स्पष्ट होते की, माहिरा पाकिस्तानबाहेर होती. त्यामुळे ती मतदान करू शकणार नव्हती, हेही स्पष्ट होते. पाकिस्तानी नेटकऱ्यांनी हे नेमके हेरले आणि यानंतर तिला ट्रोल करणे सुरु केले. मतदानाला देशात हजर नसल्याबद्दललोकांनी तिला चांगलेच फैलावर घेतले. तिच्यावर बेजबाबदार आणि कर्तव्यहिन असल्याचा आरोप लोकांनी केला. साहजिकच हे सगळे आरोप माहिराच्या जिव्हारी लागलेत. मग काय, एक भली मोठी पोस्ट लिहून माहिराने याबद्दल माफी मागितली. ‘मी मतदान करू इच्छित होते. पण दुर्दैवाने मी करू शकले नाही. माझ्या वर्क कमिटमेंट होत्या आणि याचे शेड्यूल महिनाभरापासून प्लान झाले होते. मी माझ्यापरिने सगळे प्रयत्न केलेत. मी मतदान करू शकत नाहीये, हे मी जड मनाने सांगते, ’असे माहिराने लिहिले.

Web Title: mahira khan missed pakistan election apologises for for this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.