माहिरा खान, आता पाकिस्तानात परत येऊ नकोस, अशी चेतावणी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिला मिळाली आहे. केवळ इतकेच नाही तर अर्वाच्च व आक्षेपार्ह शब्दांत तिच्यावर टीका होत आहे.  पाकिस्तानी इंटरनेट युजर्सनी माहिरावर कडाडून हल्ला चढवला आहे. आता कारण काय, हे आम्ही सांगण्याची गरज नाहीच. यामागचे कारण आहे, रणबीर कपूर व माहिरा खान या दोघांचे व्हायरल झालेले इंटिमेट फोटो. होय, रणबीर व माहिराचे हे फोटो व्हायरल झालेत आणि पाकिस्तानी नेटिजन्सचा संताप अनावर झाला.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान दोघेही स्मोकिंग करताना दिसत आहेत. माहिरा यात एका शॉर्ट  बॅकलेस ड्रेसमध्ये आहे. खरे तर हे फोटो नेमके कुठले आणि कधीचे आहेत, हे कळायला मार्ग नाही. काहींच्या मते, हे फोटो न्यूयॉर्कच्या एका हॉटेलबाहेरचे आहेत. तर काहींच्या मते, हे फोटो दुबईतील आहेत. याचवर्षी जुलैमध्ये संजय दत्तच्या बायोपिकच्या शूटींगसाठी रणबीर न्यूयॉर्कमध्ये होता. त्यावेळी माहिरा दुबईत होती. यादरम्यान रबणीर माहिराला भेटायला दुबईला गेला होता. माहिरा ज्या हॉटेलमध्ये थांबली होती. त्याच हॉटेलबाहेरचे हे फोटो असल्याचे काहींचे म्हणणे आहे. या व्हायरल झालेल्या फोटोंतीलमाहिराचा फोटो झूम करून बघितल्यानंतर  तिच्या शरिरावर काही ‘लव्ह बाईट्स’ही दिसत आहेत.
ALSO READ : SEE PICS : कॅमे-यात कैद झाली रणबीर कपूरची नवी गर्लफ्रेन्ड! ‘इंटिमेट’ फोटो व्हायरल!!

पण या फोटोंमुळे पाकिस्तानींचे माथे मात्र ठणकले आहेत. ‘शर्म से मर जाओ, पाकिस्तान से दफा हो जाओ. शॉर्ट ड्रेस उपर सिगरेट. तुम जैसी पाकी कलाकार पाकिस्तान को बदनाम करते है,’ असे एका युजर्सने लिहिले आहे.  तर एकाने ‘हमारे लोगों की हया सिर्फ पाकिस्तान की बाऊंड्री तक ही महफूस है,’अशा शब्दांत माहिरा खानवर टीका केली आहे.
अर्थात काहींनी माहिराचे समर्थनही केले आहे. तिच्या कपड्यांवरून किंवा ती कशी वागतेय यावरून तिच्याबद्दलचे मत ठरवू नका, असे सांगत काहींनी माहिराची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता या सगळ्यावर माहिरा काय भूमिका घेते, काय बोलते, ते बघूच.

Web Title: Get lost from Mahira Khan, Pakistan !! Ranbir Kapoor's photo viral as soon as the crazy user!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.