'मला हिंदी सिनेमे करण्यात इंटरेस्ट नाह, कारण...', असं का म्हणाला सुपरस्टार महेश बाबू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 13:32 IST2022-04-07T13:20:45+5:302022-04-07T13:32:03+5:30

Mahesh Babu Bollywood Debut : : सध्या अनेक साऊथ स्टार्सना बॉलिवूड डेब्यूबाबत विचारलं जातंय, अशात महेश बाबू म्हणाला तो जिथे आहे तिथे आनंदी आहे.

Mahesh Babu reaction on Bollywood debut, know what he said | 'मला हिंदी सिनेमे करण्यात इंटरेस्ट नाह, कारण...', असं का म्हणाला सुपरस्टार महेश बाबू?

'मला हिंदी सिनेमे करण्यात इंटरेस्ट नाह, कारण...', असं का म्हणाला सुपरस्टार महेश बाबू?

महेश बाबू साऊथ (Tollywood star Mahesh Babu) फिल्म इंडस्ट्रीतील प्रिन्स म्हणून ओळखला जातो. त्याला कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्याची मोठी लोकप्रियता आहे. त्याची एक झलक मिळवण्यासाठी फॅन्सची मोठी गर्दी जमते. सध्या अनेक साऊथ स्टार्सना बॉलिवूड डेब्यूबाबत विचारलं जातंय, अशात महेश बाबू म्हणाला तो जिथे आहे तिथे आनंदी आहे. त्याला हॉलिवूड किंवा बॉलिवूडमध्ये जाण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. 

काय म्हणाला महेश बाबू?

महेश बाबू नुकताच मुंबईतील एका इव्हेंटमध्ये आला होता. त्यावेळी त्याला विचारण्यात आलं की, तू हिंदी सिनेमात डेब्यू करणार का? यावर महेश बाबू म्हणाला की, 'मला हिंदी सिनेमे करण्याची गरज नाही...मी केवळ तेलुगू सिनेमेच करू शकतो...हे सिनेमे जगभरात बघितले जातात...आताही तेच होत आहे. मला अशा स्थितीतच रहायचंय जिथे केवळ मी तेलुगु सिनेमे करणार'. तेच त्याला हॉलिवूड एन्ट्रीबाबत विचारलं तर तो म्हणाला की, 'त्याला कोणत्याही हॉलिवूड प्रोजेक्टबाबत माहिती नाही'. दरम्यान सध्या RRR जगभरात धमाका करत आहे. त्याआधी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या पुष्पाने देश-विदेशात कोट्यावधी लोकांचं प्रेम मिळवलं. महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही सिनेमे तेलुगू आहेत.

या कार्यक्रमात महेश बाबू डार्क ब्लू कलरच्या डेनिम आणि मॅचिंग स्नीकर्ससोबत पेल ग्रे कलरच्या शर्टमध्ये दिसला. महेश बाबू हा त्याच्या डॅशिंग स्टाइल आणि यंग दिसण्याबाबत फार फेमस आहे. २ मुलांचा वडील झाल्यावरही त्याच्यावर वयाचा जराही फरक दिसत नाही. ४६ वर्षांचा असूनही तो आजही तेवढाच हॅंडसम दिसतो. 

महेश बाबूच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर तो परशुराम पेटलाच्या 'सरकारू वारी वाटा' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा १२ मे रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. तसेच आगामी सिनेमा तो एस. एस. राजामौली यांच्यासोबत करणार आहे.
 

Web Title: Mahesh Babu reaction on Bollywood debut, know what he said