‘बॉलिवूड अफोर्ड करू शकत नाही, पण...’; पान मसाल्याच्या जाहिरातीवरून Mahesh Babu ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 11:06 IST2022-05-16T11:03:25+5:302022-05-16T11:06:40+5:30
Mahesh Babu Controversy: ‘बॉलिवूड मुझे अफोर्ड नहीं कर सकता,’ असं म्हणत महेश बाबूनं सर्वांना हैराण केलं. वाद अंगलट येतोय म्हटल्यावर महेश बाबूनं या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अर्थात हा विषय इथेच संपलेला नाही...

‘बॉलिवूड अफोर्ड करू शकत नाही, पण...’; पान मसाल्याच्या जाहिरातीवरून Mahesh Babu ट्रोल
Mahesh Babu Controversy: साऊथ स्टार महेश बाबू (Mahesh Babu) गेल्या काही दिवसांपासून जाम चर्चेत आहे. कारण आहे त्याचं एक वक्तव्य. ‘बॉलिवूड मुझे अफोर्ड नहीं कर सकता,’ असं म्हणत अलीकडे महेश बाबूनं सर्वांना हैराण केलं. त्याच्या या वक्तव्यावर अनेक बऱ्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अगदी या निमित्तानं बॉलिवूड विरूद्ध साऊथ सिनेमा असा वादही निर्माण झाला. वाद अंगलट येतोय म्हटल्यावर महेश बाबूनं स्पष्टीकरण देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अर्थात हा विषय इथेच संपलेला नाही. सोशल मीडियावर अद्यापही महेश बाबूच्या याच वक्तव्याची चर्चा आहे आणि आता महेश बाबू सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतोय. महेश बाबूने केलेल्या पान मसाल्याच्या जाहिरातीवरून नेटकऱ्यांनी त्याला फैलावर घेतलं आहे.
@urstrulyMahesh bollywood can't afford u but pan masala brand does 🤭😂😂 pic.twitter.com/CI7Lkqij1d
— SAMBIT ASH 🇮🇳 (@SAMBITASH2) May 11, 2022
गेल्या वर्षी महेश बाबूने टायगर श्रॉफसोबत मिळून एका पान मसाल्याची जाहिरात केली होती. त्यावरून सध्या त्याला ट्रोल केलं जातंय. ‘बॉलिवूड महेश बाबूला अफोर्ड करू शकत नाही, पण पान मसाला ब्रँड त्याला अफोर्ड करू शकतं,’ अशा शब्दांत एका युजरने त्याला सुनावलं आहे. अनेक युजर्सनी याच आशयाच्या कमेंट्स करत महेश बाबूला फैलावर घेतलं आहे.
A Pan Masala Company Can Afford @urstrulyMahesh but Bollywood Cannot 🤣🤣
— Sourav Gupta (@SouravGupta09) May 14, 2022
I assume only TFI stars like #MaheshBabu are allowed to sell Pan Masala products, while the rest are abused for doing the same. Nice double standards😒 @Its_CineHub
— J.P.S (@TheJ_P_S) May 12, 2022
#SarkaruVaariPaata#SVP#PrithvirajChauhanpic.twitter.com/ymuv2Vw1oi
काय म्हणाला होता महेश बाबू
बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याचा विचार आहे का? असा सवाल महेश बाबूला या इव्हेंटमध्ये विचारण्यात आला होता. यावर महेशबाबूनं हैराण करणारं उत्तर दिलं होतं. ‘बॉलिवूडमधून मला अनेक ऑफर्स मिळतात. पण मला वाटतं,बॉलिवूड मला अफोर्ड करू शकणार नाही. त्यांना मी परवडणार नाही. त्यामुळे मी तिथे जाऊन माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही,’असं महेश बाबू म्हणाला होता. ‘मला साऊथच्या सिनेमांनी जेवढं काही स्टारडम, यश, प्रेम दिलं आहे, ते भरपूर आहे. मला आणखी स्टारडम नकोय. माझी इंडस्ट्री सोडून दुसरीकडे काम करण्याची माझा विचार नाही,’असंही तो म्हणाला होता.
त्याच्या या वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर महेश बाबूनं स्पष्टीकरण देत माफी मागितली होती. ‘मी ज्या चित्रपटसृष्टीत काम करतोय, त्याठिकाणी मी कंफर्टेबल आहे. मी सर्व भाषांचा आदर करतो,’ असं तो म्हणाला होता.