टाइम्स स्क्वेअरवर झळकण्यासाठी महेश बाबूच्या लेकीने घेतलं अफाट मानधन; सिताराची फी ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 10:23 IST2023-07-10T10:22:24+5:302023-07-10T10:23:03+5:30

Sitara: महेश बाबूची लेक सितारा घट्टामनेनी ही एका ज्वेलरी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर असून ४ जुलै रोजी तिची एक जाहिरात न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर दाखवण्यात आली.

mahesh babu daughter sitara charged one crore for times square advertisement | टाइम्स स्क्वेअरवर झळकण्यासाठी महेश बाबूच्या लेकीने घेतलं अफाट मानधन; सिताराची फी ऐकून व्हाल थक्क

टाइम्स स्क्वेअरवर झळकण्यासाठी महेश बाबूच्या लेकीने घेतलं अफाट मानधन; सिताराची फी ऐकून व्हाल थक्क

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याची लेक सितारा सध्या तिच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत येत आहे. वयाच्या ११ व्या वर्षी सिताराची ही जाहिरात टाइम्स स्क्वेअरवर झळकली. विशेष म्हणजे टाइम्स स्क्वेअरवर झळणारी पहिली स्टारकिड सितारा ठरली आहे. त्यामुळे ती चर्चेत येत आहे. यामध्येच तिने यासाठी किती मानधन घेतलं हे समोर आलं आहे. ११ वर्षांची असलेल्या सिताराने चक्क कोटींच्या घरात मानधन घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.


महेश बाबूची लेक सितारा घट्टामनेनी ही एका ज्वेलरी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर असून ४ जुलै रोजी तिची एक जाहिरात न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर दाखवण्यात आली. ही जाहिरात जगभरात वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे या जाहिरातीनंतर सितारा तिच्या मानधनामुळे चर्चेत आली. सिताराने या जाहिरातीसाठी एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

दरम्यान,निताराने सारा अली खान, सुहाना खान, जान्हवी कपूर यांसारख्या स्टार किड्सला मागे टाकत जगभरात लोकप्रियता मिळवली. सिताराची जाहिरात टाइम्स स्क्वेअरवर झळकल्यानंतर  नम्रता शिरोडकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लेकीचं कौतुक केलं. त्यानंतर तिची पोस्ट व्हायरल झाली.
 

Web Title: mahesh babu daughter sitara charged one crore for times square advertisement