नितीश भारद्वाज यांना आठवण आली त्यांच्या जुन्या नायिकेची, सोशल मीडियावर विचारले कुठे आहे मीनू मौसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 17:54 IST2020-05-08T17:50:37+5:302020-05-08T17:54:55+5:30
नितीश भारद्वाज यांनी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ही प्रसिद्ध अभिनेत्री सध्या कुठे असते असे विचारले आहे.

नितीश भारद्वाज यांना आठवण आली त्यांच्या जुन्या नायिकेची, सोशल मीडियावर विचारले कुठे आहे मीनू मौसी
सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने कोणत्याच मालिका, चित्रपटाचे चित्रीकरण होत नाहीये. त्यामुळे प्रेक्षकांना जुन्या मालिका छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहेत. महाभारत ही प्रेक्षकांची आवडती मालिका सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या प्रचंड आवडत्या आहेत. या मालिकेत आपल्याला श्रीकृष्णाच्या भूमिकेत नितीश भारद्वाज यांना पाहायला मिळाले होते. या मालिकेमुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेनंतर नितीश यांना अनेक मालिकेत, चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
सध्या नितीश भारद्वाज सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून ते त्यांचे अनेक जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. या फोटोंमधील एका फोटोत ते मिनाक्षी शेषाद्रीसोबत दिसत असून त्यांचा एक वेगळाच अंदाज या फोटोत पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत त्यांनी मिनाक्षीविषयी खूप काही चांगले लिहिले आहे. त्यांनी लिहिलेले आहे की, मिनाक्षी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. नचे नागिन गली गलीमध्ये मिनाक्षी माझी नायिका होती. मिनाक्षी तिच्या कुटुंबियांसोबत सुरक्षित असावी अशी मला आशा आहे. सध्या मिनाक्षी कुठे आहे याचा मी विचार करत होतो. या चित्रपटात मिनाक्षीसोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.
Meenakshi Sheshadri, my heroine in 'Nache Nagin Gali Gali'; Where are you Meenu Mausi? I hope you are safe & with family. Thinking of you. You were kind to me in the shoot.#Meenakshisheshadri#MeenakshiSeshadri@timesofindia@filmfare@htTweetspic.twitter.com/pDcEHy24mr
— Nitish Bharadwaj (@nitishkrishna8) May 7, 2020
मिनाक्षी शेषाद्रीने हिरो, जुर्म, दामिनी अशा अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. १९९६ मध्ये चित्रपटातून संन्यास घेऊन ती नवऱ्याबरोबर अमेरिकेत स्थायिक झाली. मीनाक्षीला दोन मुलं आहेत. ती अमेरिकेत भरतनाट्यमचं प्रशिक्षण देते. मिनाक्षी चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.