अरेंज नव्हे तर लव्ह मॅरेज? 'असं' जमलं माधुरी दीक्षितचं लग्न, खुलासा करत म्हणाली-"जर मी चुकीच्या माणसाला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:42 IST2025-12-05T13:23:06+5:302025-12-05T13:42:02+5:30
'या' खास व्यक्तीमुळे झाली माधुरी अन् डॉ. नेनेंची पहिली भेट, अभिनेत्री म्हणाली...

अरेंज नव्हे तर लव्ह मॅरेज? 'असं' जमलं माधुरी दीक्षितचं लग्न, खुलासा करत म्हणाली-"जर मी चुकीच्या माणसाला..."
Madhuri Dixit: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने हे कायम चर्चेत असणारं जोडपं आहे. या जोडप्याकडे एक आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांचा लग्नसोहळा १७ ऑक्टोबर १९९९ रोजी अमेरिकेत पार पडला. लग्न झाल्यानंतर माधुरी काही वर्ष परदेशात वास्तव्यास होती.पण,डॉ.नेने कलाविश्वातील नसल्यामुळे त्याचं लग्न कसं जमलं, असा प्रश्न अनेकांना पडतो. अखेर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.
माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने यांनी लग्नापूर्वी एकमेकांना डेट केलं होतं. अलिकडेच रणबीर अलाहबादियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या प्रेमकहाणीविषयी सांगितलं. तेव्हा ती म्हणाली,"माझे मित्र-मंडळी नेहमीच मला लग्नाबद्दल बोलायचे, पण माझ्यासाठी माझं करिअर खूप महत्वाचं होतं आणि मला वाटायचं की जर मी चुकीच्या माणसाला भेटले तर आयुष्यातील आनंद निघून जाईल. पण, अगदीच परीकथेप्रमाणेच माझं लग्न होईल असा मी कधीच विचार केला नाही." त्यानंतर पुढे माधुरी म्हणाली,"मी स्वत:ला नशीबवान समजते की मला असा प्रेम करणारा नवरा मिळाला. मला वाटतं त्यासाठी नात्यात एकमेकांचा आदर आणि सकारात्मकता असली पाहिजे.आमचं नातं कला आणि विज्ञानाचं एक संगम आहे."
६ महिने केलं डेट...
याचदरम्यान, माधुरी दीक्षितने सांगितलं की डॉ.नेने आणि तिची भेट ही तिच्या भावामुळे झाली होती. परंतु, लग्नाच्या ६ महिन्यांपूर्वी दोघांनी एकमेकांना डेट केलं होतं. त्यानंतर त्यांचे सूर जुळले. नेने यांच्याबद्दलच्या काही चांगल्या गोष्टी सांगताना माधुरी म्हणाली, "जेव्हा ते त्यांच्या रुग्णांबद्दल बोलतात त्यांच्यासाठी ते ज्या पद्धतीने लढतात, त्यांचं वर्तन फार छान असतं. ते खूप काळजी घेणारे, सुशिक्षित, बुद्धिमान आहेत आणि त्यांना फोटोग्राफीमध्येही खूप रस आहे. ते माझ्या आयुष्यात मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे. अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या.