माधुरी दीक्षित गंभीर दुखण्याने बेजार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2016 16:06 IST2016-09-05T10:36:12+5:302016-09-05T16:06:12+5:30
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिला खांद्याच्या गंभीर दुखण्याने ग्रासले आहे. खांद्यातील वेदना असह्य झाल्याने माधुरीला उपचारासाठी तात्काळ अमेरिकेला ...

माधुरी दीक्षित गंभीर दुखण्याने बेजार !
ब लिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिला खांद्याच्या गंभीर दुखण्याने ग्रासले आहे. खांद्यातील वेदना असह्य झाल्याने माधुरीला उपचारासाठी तात्काळ अमेरिकेला हलवण्यात आले आहे. या दुखण्यामुळे माधुरीने एका रिअॅलिटी शोच्या शूटींगदरम्यान दीर्घ सुट्टी घ्यावी लागली होती. गेल्या अनेक दिवसांपासून तिला या दुखण्याने ग्रासले आहे. मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे याकडे दुर्लक्ष झाले. मात्र अचानक तिच्या खांद्यात इतक्या तीव्र वेदना उठल्या की तिला सहन करणे कठीण झाले. यानंतर माधुरी पती श्रीराम नेने यांच्यासोबत उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाली. अमेरिकेत डॉक्टर असलेले श्रीराम नेने यांच्यासोबत माधुरीने लग्नगाठ बांधली होती. माधुरीच्या लग्नाला आता १६ वर्षे झाली आहेत. सन २०११ मध्ये माधुरी तिची दोन्ही मुले रेयान व आरिनसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती. भारतात परतल्यानंतर माधुरीने अनेक रिअॅलिटी शो जज केलेत. शिवाय ‘डेढ इश्किया’ आणि ‘गुलाबी गँग’ सारखे चित्रपटही केलेत.