बोल्डनेसचा तडका अन् विनोदाची मेजवानी lust stories 2 चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:53 IST2023-06-21T12:52:11+5:302023-06-21T12:53:03+5:30

lust stories 2 trailer: प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये काही अंशी बोल्ड सीनचा भरणा करण्यात आला आहे. तर, काही विनोदी सीनचाही समावेश आहे.

lust stories 2 trailer out kajol mrunal thakur neena gupta tamannaah bhatia vijay varma | बोल्डनेसचा तडका अन् विनोदाची मेजवानी lust stories 2 चा ट्रेलर रिलीज

बोल्डनेसचा तडका अन् विनोदाची मेजवानी lust stories 2 चा ट्रेलर रिलीज

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर लस्ट स्टोरीज 2 (Lust Stories 2) या सिनेमाची चर्चा आहे. अलिकडेच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरमध्ये बरेच बोल्ड सीन असल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये या सिनेमाची चर्चा रंगली. इतकंच नाही तर अनेक जण याच्या ट्रेलरचीही वाट पाहत होते. अखेर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
 लस्ट स्टोरीजमध्ये पहिल्यांदाच तमन्ना भाटियाने इंटिमेट सीन दिले आहेत. आतापर्यंत जवळपास १८ वर्ष तमन्नाने नो किसिंग ही अट ठेवली होती. मात्र, या सिनेमासाठी तिने तिचीही अट मोडली असून अभिनेता विजय वर्मासोबत इंटिमेट सीन दिले. त्यामुळे हा सिनेमा सर्वाधिक चर्चिला जात आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये काही अंशी बोल्ड सीनचा भरणा करण्यात आला आहे. तर, काही विनोदी सीनचाही समावेश आहे. हे विनोदी सीन अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या विनोदबुद्धीच्या जोरावर आणखी रंजक केले आहेत.

दरम्यान, या सिनेमामध्ये तमन्नासह विजय वर्मा, काजोल,अमृता सुभाष, मृणाल ठाकूर, अंगद बेदी या कलाकारांचा समावेश आहे. लस्ट स्टोरीज पार्ट 2 मध्ये चारही कथांचं दिग्दर्शन अमित शर्मा, कोंकणा सेन शर्मा, आर.बाल्की, सुजॉय घोष या चार दिग्दर्शकांनी केलं आहे.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: lust stories 2 trailer out kajol mrunal thakur neena gupta tamannaah bhatia vijay varma