Lust Stories 2 मधील ही अभिनेत्री आहे जया बच्चन यांची सूनबाई, तिचा आहे बच्चन कुटुंबाशी जवळचा संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 16:20 IST2023-07-04T16:18:53+5:302023-07-04T16:20:28+5:30

अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती नाही.

lust stories 2 fame tillotama shome is married to jaya bachchan nephew kunal ross | Lust Stories 2 मधील ही अभिनेत्री आहे जया बच्चन यांची सूनबाई, तिचा आहे बच्चन कुटुंबाशी जवळचा संबंध

Lust Stories 2 मधील ही अभिनेत्री आहे जया बच्चन यांची सूनबाई, तिचा आहे बच्चन कुटुंबाशी जवळचा संबंध

अभिनेत्री तिलोत्तमा शोम नेटफ्लिक्सच्या 'लस्ट स्टोरीज 2' मधील तिच्या अभिनयामुळे चर्चेत आहे. 'किस्सा', 'अ डेथ इन द गुंज', 'सर', 'दिल्ली क्राइम' आणि 'द नाईट मॅनेजर' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून तिने चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.  तिलोत्तमा तिच्या चित्रपट कारकिर्दीच्या शिखरावर असताना, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती नाही. तिलोत्तमा शोमचे लग्न ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा भाचा कुणाल रॉसशी झाले आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे.

2015 मध्ये अभिनेत्री तिलोत्तमा शोमने कुणाल रॉससोबत लग्न केले. या जोडप्याचे गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग झाले होते. त्यांच्या लग्नाला संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होते. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याने या लग्नाला हजेरी लावली होती. तिलोत्तमा शोम आणि कुणाल रॉस यांनी बंगाली पद्धतीने लग्न केले. 
तिलोत्तमा ही जया बच्चन यांची बहीण नीता भादुरी यांची सून आहे. 

कुणाल रॉसने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरात व्यवसायातून केली होती. पुढे तो बिझनेसमन झाला आणि त्याने 'द इंडियन बीन' नावाची कंपनी सुरू केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिलोतमा शोमने अभिनेत्रीच्या चुलत भावाच्या घरी कुणालची भेट घेतली. 

कुणाल रॉसने आपले शालेय शिक्षण 'द डेली कॉलेज', इंदूर, मध्य प्रदेश येथून पूर्ण केले. त्यानंतर त्याने कर्नाटकातील मणिपाल येथील 'वेलकम ग्रुप ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन'मधून हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतले.
 

Web Title: lust stories 2 fame tillotama shome is married to jaya bachchan nephew kunal ross

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.