पहिला संसार वर्षभरातच मोडला, मग गुपचुप बांधली बालमैत्रिणीशी लग्नगाठ! अरिजीत सिंहची Untold लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 12:24 PM2024-04-25T12:24:25+5:302024-04-25T12:25:06+5:30

अरिजित सिंहचं वैयक्तिक आयुष्यही थोडसं फिल्मी आहे.

Love Story Of Famous Singer Arijit Singh And His Second Marriage Wife Koyal | पहिला संसार वर्षभरातच मोडला, मग गुपचुप बांधली बालमैत्रिणीशी लग्नगाठ! अरिजीत सिंहची Untold लव्हस्टोरी

पहिला संसार वर्षभरातच मोडला, मग गुपचुप बांधली बालमैत्रिणीशी लग्नगाठ! अरिजीत सिंहची Untold लव्हस्टोरी

बॉलिवूड गायक अरिजित सिंहचा आज वाढदिवस आहे. मधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अरिजित सिंहची अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत. गाणीच नाही तर अरिजित सिंहचीही लव्ह स्टोरीही झकास आहे. अरिजित सिंहचं वैयक्तिक आयुष्यही थोडसं फिल्मी आहे.  आज अरिजितच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या लव्हलाईफबद्दल जाणून घेऊयात.

अरिजितचे 2 विवाह झाले आहेत. हे फारच कमी लोकांना माहिती असेल. अरिजितनं 2013 साली गायिका रूपरेखा बॅनर्जीशी लग्न केलं होतं. पण, या दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले.लग्न मोडल्यानंतर अरिजित हृदय तुटलं. यानंतरच अरिजितच्या आयुष्यात 'कोयल' आली. अरिजित आणि कोयल हे बालपणापासूनचे मित्र होते. अरिजित सिंगने कोयलला 'तुम ही हो' हे गाणे गाऊन अतिशय फिल्मी पद्धतीने प्रपोज केलं होतं.

कोयल हिला पहिल्या लग्नापासून एक मुलगादेखील होता. एका मुलाची आई असलेल्या कोयलला अरिजीतने पत्नी म्हणून स्वीकारलं. 20 जानेवारी 2014 रोजी पश्चिम बंगालमधील तारापीठ मंदिरात दोघांनी लग्नगाठ बांधली. कोयलशी लग्नाची बातमी अरिजित सिंहने बराच काळ लपवून ठेवली होती. आता कोयल व अरिजीत दोघेही आनंदात जगत आहेत.  अरिजितला तीन मुले आहेत. एकमेकांसोबत आनंदी आहेत. अरिजीतला वैयक्तिक आयुष्यावर बोलणे आवडत नाही. सोशल मीडियावरसुद्धा तो आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही पोस्ट करत नाही.

अरिजीत सिंहच्या कारकिर्दिला 'फेम गुरूकुल' या कार्यक्रमाद्वारे सुरुवात झाली होती. या रिअ‍ॅलिटी शो नंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या  'सावरियाँ' या चित्रपटासाठी त्यानं गाणं गायलं होतं. पण, काही कारणास्तव ते गाणं प्रदर्शित झालं नाही. मात्र यानंतर अरिजीतला कामं मिळत गेली. आज अरिजीतने एक गायक, संगीतकार म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याने हिंदीप्रमाणे अनेक प्रादेशिक भाषेत देखील गाणी गायली आहेत. 'अगर तुम साथ हो', 'समझावा', 'कबिरा', 'तुम ही हो', 'फिर भी तुमको चाहुंगा' अरिजितची ही गाणी लोकप्रिय आहेत.
 

Web Title: Love Story Of Famous Singer Arijit Singh And His Second Marriage Wife Koyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.