'पृथ्वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 17:57 IST2020-01-23T17:56:40+5:302020-01-23T17:57:07+5:30
Prithviraj Movie : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर 'पृथ्वीराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.

'पृथ्वीराज' चित्रपटातील मानुषी छिल्लरचा असा आहे लूक, शेअर केला फोटो
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर 'पृथ्वीराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मानुषीनं नुकताच तिचा चित्रपटातील लूक शेअर केला आहे.
पृथ्वीराज चित्रपट राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटात मानुषी छिल्लर पृथ्वीराज चौहान यांची पत्नी संयोगिताची भूमिका साकारणार आहे. मानुषीने या चित्रपटातील तिचा लूक शेअर केला आहे.
मानुषीने इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर करत लिहिले की, संयोगिता.
अक्षय कुमारसोबत मोठ्या बॅनरच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे खूश आहे. तिने याबाबत म्हटलं की, माझ्यासाठी सन्मान व गर्वाची बाब आहे की यशराज फिल्म्स सारख्या प्रोडक्शन हाऊसने माझी अभिनेत्री म्हणून निवड केलीय. मला प्रवासादरम्यान शिकायला मिळणाऱ्या गोष्टींमुळे मी खूप खूश आणि उत्सुक आहे. माझे जीवन फेअरी टेलसारखं आहे. आधी मिस इंडिया मग मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी इतका मोठा प्रोजेक्ट मिळणं माझ्या जीवनातील रोमांचकारी चॅप्टर आहे.
पृथ्वीराज चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत होत असून हा चित्रपट चौहान वंशाच्या हिंदू क्षत्रिय राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारीत आहे.
या चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार आहे आणि मानुषी छिल्लर राणी संयोगिताची भूमिका निभावणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन एपिक सीरिज चाणक्य व पिंजर चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी करत आहेत.