शरद केळकर ठरला Most stylish Path Breaker; 'लोकमत' पुरस्कार सोहळ्यात झाला गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 23:43 IST2023-09-12T23:42:12+5:302023-09-12T23:43:00+5:30
Sharad kelkar: शरद कायम आव्हानात्मक भूमिका स्वीकारतो. मात्र, त्या प्रत्येक भूमिकेला तो उत्तमरित्या न्याय देतो.

शरद केळकर ठरला Most stylish Path Breaker; 'लोकमत' पुरस्कार सोहळ्यात झाला गौरव
मराठी आणि हिंदीत आपल्या भारदस्त आवाजाने प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar). जवळपास १९ वर्षांपासून शरद कलाविश्वात सक्रीय आहे. या १९ वर्षांच्या काळात त्याने अनेक विविधांगी भूमिका साकारल्या. अगदी स्त्री भूमिकांपासून ते तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारण्यापर्यंत त्याच्या प्रत्येक भूमिकेचं विशेष कौतुक झालं. त्यामुळेच शरद केळकरचा यंदाच्या लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला. Most stylish Path Breaker(male) या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं.
शरद कायम आव्हानात्मक भूमिका स्वीकारतो. मात्र, त्या प्रत्येक भूमिकेला तो उत्तमरित्या न्याय देतो.इतकंच नाही तर तो कायम नवनवीन रेकॉर्डही करताना दिसतो. बॉक्स ऑफिसवर त्याचे अनेक सिनेमा गाजले आहेत. विशेष म्हणजे अभिनयासोबत शरद केळकरने अनेक सिनेमातील पात्रांना त्याचा आवाज दिला आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'लक्ष्मी' या सिनेमात शरदने लक्ष्मी ही तृतीयपंथी भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे पहिल्यांदाच त्याने एका तृतीयपंथीची भूमिका साकारली. मात्र, ही भूमिका विशेष गाजली.
दरम्यान, शरदने बराच मोठा स्ट्रगल करुन कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एक वेळ अशी होती जेव्हा केवळ ४ अंडी आणि २ पोळ्या खाऊन तो दिवस काढायचा. मात्र, आज तो कोटयवधींचा मालक आहे. शरदने मोहनजोदारो, लई भारी, रॉकी हँडसम, हाउसफुल 4, तान्हाजी: द अनसंग वॉरियर अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.