‘घूमर गर्ल’चा जलवा! संयमी खेर ठरली ‘Most Stylish Inspiring Performer’, मराठीतून व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 23:10 IST2023-09-12T23:09:19+5:302023-09-12T23:10:17+5:30
Lokmat Most Stylish Award 2023 : बॉलिवूड अभिनेत्री संयमी खेरला यंदाच्या मोस्ट स्टायलिश इनस्पायरिंग परफॉर्मर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

‘घूमर गर्ल’चा जलवा! संयमी खेर ठरली ‘Most Stylish Inspiring Performer’, मराठीतून व्यक्त केल्या भावना
दरवर्षी लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात मनोरंजन, उद्योग, राजकारणातील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा सन्मान केला जातो. यंदा हा सोहळा मुंबईतील सेंट रेजिस येथे मंगळवारी(१२ सप्टेंबर) पार पडला. कलाविश्वातील अनेक सितारे लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर अवतरलेले दिसले. मराठीसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी लोकमच्या अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.
बॉलिवूड अभिनेत्री संयमी खेरला यंदाच्या मोस्ट स्टायलिश इनस्पायरिंग परफॉर्मर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ‘घूमर’ या चित्रपटातील कामगिरीसाठी संयमीला हा पुरस्कार देण्यात आला. या चित्रपटात तिने महिला क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. गेल्याच महिन्यात ‘घूमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील संयमीच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही करण्यात आलं होतं. ‘घूमर’ चित्रपटात संयमीने बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनसह स्क्रीन शेअर केली होती.
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यासाठी संयमीने खास लूक केला होता. या अवॉर्ड सोहळ्यात ती सोनेरी रंगाच्या साडीत दिसून आली. तिने बन बांधून झुमके घातले होते. साध्या पण ग्लॅमरस लूकने संयमीने अवॉर्ड सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
संयमीने ‘चोक’, ‘फाडू’, ‘मिर्झ्या’, ‘रे’, ‘लखनौ सेन्ट्रल’ या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. रितेश देशमुखच्या माऊली चित्रपटातही संयमी झळकली होती. याबरोबरच तिने ‘ब्रीथ : इन्टू द शॅडोज’ या वेब सीरिजमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती.