Lockdown: हॉरर सिनेमांचे चाहते असाल तर हे सिनेमे नक्की बघा, पण जरा जपून...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 18:56 IST2020-04-03T17:49:24+5:302020-04-03T18:56:42+5:30

अंगाचा थरकाप उडवणारे आहेत हे आगामी हॉरर सिनेमे !

 Lockdown: horror movies you should watch during quarantine coronavirus | Lockdown: हॉरर सिनेमांचे चाहते असाल तर हे सिनेमे नक्की बघा, पण जरा जपून...!!

Lockdown: हॉरर सिनेमांचे चाहते असाल तर हे सिनेमे नक्की बघा, पण जरा जपून...!!

ठळक मुद्देहॉलिवूड सीरिजचा हॉरर चित्रपट  ‘अ‍ॅनाबेल’चा तिसरा पार्ट ‘अ‍ॅनाबेल कम्स होम’ हा चित्रपट बेस्ट आहे.

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये प्रत्येक प्रेक्षकांच्या टेस्टनुसार सिनेमे बनणार, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. रोमान्स आवडणा-यांसाठी रोमॅन्टिक चित्रपट, कॉमेडी आवडणा-यांसाठी कॉमेडी सिनेमे आणि हॉरर सिनेप्रेमींसाठी हॉरर सिनेमे. तुम्हीही भयपटांचे चाहते असाल तर या लॉकडाऊनच्या काळात हे काही भन्नाट हॉरर सिनेमे तुम्ही पहायलाच हवेत...

परी 

या सिनेमात अनुष्का शर्माने अप्रतिम अभिनय केला आहे. तिच्यासाठी आणि एक नाविण्यपूर्ण कथा बघायची असेल तर हा सिनेमा तुम्ही पाहायलाच हवा.

ब्लेर विच

ही एका मुलाची आणि त्याच्या मित्रांची कथा आहे. मुलाच्या हरवलेल्या बहिणीचा शोध घेत हे सगळे एका जंगलात जातात आणि या जंगलात अंगाला थरकाप आणणा-या घटनांची मालिका सुरु होते.

गेट आऊट

दिग्दर्शक जॉर्डन पील यांनी बनवलेल्या या सिनेमात एका विचित्र कुटुंबाची कथा आहे. हे कुटुंब आपल्या मुलीच्या बॉयफ्रेन्डच्या जीवावर उठते. मुलीचा बॉयफ्रेन्ड आपला जीव कसा वाचवतो आणि या विचित्र कुटुंबात नेमकी काय गडबड आहे, हे या चित्रपटात तुम्हाला बघता येईल.

तुम्बाड

तुम्बाड हा हॉररपेक्षा एक सायकॉलॉजिकल थ्रीलर सिनेमा आहे. मेंदूला झिणझिण्या आणणारा हा सिनेमा तुम्ही एकदा बघायलाच हवा.

वेरोनिका

वेरोनिका एका मुलीची आणि तिच्या मित्रांची कथा आहे. जे काही आत्म्यांना बोलवतात. काही वाईट आत्मा त्यांच्या जवळ येतात आणि मग काय घडते, ते या सिनेमात तुम्ही पाहू शकाल.

रोजमेरीज बेबी

रोजमेरी नावाच्या एका महिलेची कथा यात पाहायला मिळते. आपल्या पतीसोबत ती एका नव्या घरात शिफ्ट होते. ती प्रेग्नंट असताना या घरात अशा काही विचित्र आणि भयावह घटना घडतात की, त्या पाहतांना अंगावर शहारे येतात.

स्लीपिंग हॉलो

या चित्रपटात एका पोलिस अधिका-याला न्यूयॉर्कमधील स्लीपिंग हॉलो नामक ठिकाणी सतत होत असलेल्या हत्यांचा तपास करण्यासाठी पाठवण्यात येते. एक धड नसलेली व्यक्ति या सगळ्या हत्या करत असते.

मा

मा हा एक अमेरिकन सायकॉलॉजिकल हॉरर सिनेमा आहे. या सिनेमात आॅक्टेविया स्पेंसर, ज्युलिएट लुईस, डायना सिल्वहर, ल्यूक इवांस असे अनेक स्टार्स आहेत. एक एकटी राहणारी महिला काही तरूण मुलामुलींना तिच्या बेसमेंटमध्ये पार्टी करण्याची परवानगी देते त्यानंतर काय घडते, हे तुम्ही या सिनेमात पाहू शकाल.

अ‍ॅनाबेल कम्स होम

हॉलिवूड सीरिजचा हॉरर चित्रपट  ‘अ‍ॅनाबेल’चा तिसरा पार्ट ‘अ‍ॅनाबेल कम्स होम’ हा चित्रपट बेस्ट आहे. २०१४ मध्ये  अ‍ॅनाबेल' रिलीज झाला होता. २०१७ मध्ये  अ‍ॅनाबेल क्रिएशन्  प्रदर्शित झाला होता.  

Web Title:  Lockdown: horror movies you should watch during quarantine coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.