LMOTY 2022: रणवीर सिंग स्टेजवर पोहोचताच थेट नाना पाटेकरांसमोर झाला नतमस्तक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 21:31 IST2022-10-11T21:11:07+5:302022-10-11T21:31:06+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022:अभिनेता रणवीर सिंह याला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

LMOTY 2022: रणवीर सिंग स्टेजवर पोहोचताच थेट नाना पाटेकरांसमोर झाला नतमस्तक!
लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळा आज मुंबईत रंगला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, प्रशासन, उद्योग अशा विविध श्रेणीतील मान्यवरांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर येताच रणवीर सिंग थेट नाना पाटेकरांच्या पाया पडला. त्यानंतर नानांनी त्याला मिठ्ठी मारली.
रणवीर सिंगनं नानांचे मानले आभार
तो पुढे म्हणाला की, मी नानांना पाहून अभिनय करायला शिकलो, आज त्यांच्या समोर मला हा पुरस्कार स्वीकारण्यात खरोखर अभिमान वाटतो. मला तुमचा खूप आदर वाटतो आणि आज मी तुमच्यासोबत मंचावर उभा आहे, त्यामुळे मी खूप खूश आहे. कलाविश्वाला तुम्ही दिलेल्या योगदानासाठी मी तुमचे आभार मानतो. क्रांतीवीर चित्रपटातील मला तुमची गाणी खूप आवडली होती. त्यावेळी त्याने नाना पाटेकर यांना विचारलं की तुम्हाला हा चित्रपट आठवतो का त्यावर नाना पाटेकर मजेशीर अंदाजात म्हणाले की, मुझे भुलना अच्छा लगता है... असं नानांनी म्हणताच सर्वांना हसू आवरलं नाही.
तुमचे चित्रपट नेहमी आमच्या मनात कायम घर करून राहतील. ते डायलॉग आणि गाणी. अशा आयकॉनिक अभिनेत्यासोबत आज मी मंच शेअर करतो आहे. याचा मला खूप आनंद आहे, असं यावेळी रणवीर म्हणाला.