LMOTY 2022: '...आजही मला अमिताभ बच्चन यांच्यासारखे बनायचंय', रणवीर सिंगनं बिग बींना अवॉर्ड केला समर्पित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 09:06 PM2022-10-11T21:06:51+5:302022-10-11T21:07:46+5:30

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: अभिनेता रणवीर सिंग याला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याने हा पुरस्कार त्याचे आदर्श व्यक्ती अमिताभ बच्चन यांना समर्पित केला.

LMOTY 2022: '...even today I want to be like Amitabh Bachchan', Ranveer Singh dedicated the award to Big B | LMOTY 2022: '...आजही मला अमिताभ बच्चन यांच्यासारखे बनायचंय', रणवीर सिंगनं बिग बींना अवॉर्ड केला समर्पित

LMOTY 2022: '...आजही मला अमिताभ बच्चन यांच्यासारखे बनायचंय', रणवीर सिंगनं बिग बींना अवॉर्ड केला समर्पित

googlenewsNext

लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार (Lokmat Maharashtrian of the Year Awards) सोहळा आज मुंबईत रंगला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, प्रशासन, उद्योग अशा विविध श्रेणीतील मान्यवरांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh)ला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी रणवीर सिंगने पुरस्कार स्वीकारल्यानंतर बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि हा पुरस्कार त्यांना समर्पित केला.

यावेळी रणवीर सिंगने मंचावर उपस्थित असलेले विख्यात अभिनेते नाना पाटेकर यांना म्हटले की, तुमचे मित्र अमिताभ बच्चन आणि माझे आदर्श व्यक्ती अमिताभ बच्चन यांचा आज ८०वा वाढदिवस आहे. यावेळी रणवीर सिंगने अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आणि त्याने हा पुरस्कार बिग बींना समर्पित केला. 


तो पुढे म्हणाला की, मी लहानपणापासूनच अमिताभ बच्चन बनायचे होते आणि आजही मला त्यांच्यासारखे बनायचे आहे. पुढेही त्यांच्यासारखे बनायची इच्छा आहे. वयाच्या ८०व्या वर्षी देखील ते अभिनय क्षेत्रात सक्रीय कार्यरत आहे, जे वाखाणण्याजोगे आहे. 

'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कार दोनदा मिळवणारा रणवीर सिंग ठरला पहिला व्यक्ती

यावेळी मंचावर उपस्थित लोकमत मीडियाचे संपादकीय संचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी रणवीर सिंगला आठवण करून दिली की, रणवीर सिंग हा पहिला अभिनेता आहे, ज्याला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने दोनदा सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याला सर्वात पहिला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी मिळाला होता. अशारितीने 'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कार दोनदा मिळवणारा रणवीर सिंग पहिला व्यक्ती ठरला आहे. या सोहळ्यात रणवीर सिंगच्या अभिनयासोबतच त्यांच्या एनर्जी आणि फॅशनचीही प्रशंसा करण्यात आली. 
 

Web Title: LMOTY 2022: '...even today I want to be like Amitabh Bachchan', Ranveer Singh dedicated the award to Big B

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.