"तुमची उणीव नक्कीच भासेल…", आशा भोसलेंच्या निधनानंतर शाहरुख खान हळहळला, भावनिक पोस्ट शेअर करून वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 17:17 IST2026-04-12T17:04:59+5:302026-04-12T17:17:53+5:30
बॉलिवूडच्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.

"तुमची उणीव नक्कीच भासेल…", आशा भोसलेंच्या निधनानंतर शाहरुख खान हळहळला, भावनिक पोस्ट शेअर करून वाहिली श्रद्धांजली
Sharukh Khan Post: बॉलिवूडच्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. काल ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती खालावली त्यामुळे ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या नातीने छातीत इन्फेकशन झाल्याचे सांगितले. पण आज आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.आशा भोसले यांच्या निधनाच्या बातमीनं कलाविश्वाला आणि संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी भावुक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
हिंदीसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना आशा भोसले यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर काहींनी त्यांच्या काही भावुक आठवणी शेअर केल्याचं पाहायला मिळतंय. अशातच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने देखील आशा भोसलेंसोबतचा एक जुना फोटो पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
It’s truly sad to learn about Asha Tai’s passing… her voice has been one of the pillars of Indian cinema and will continue to resonate world over for centuries to come. A talent that will outlive many, she always showered me with blessings and love and i will miss her. Rest in… pic.twitter.com/ISuOwuAzDj
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 12, 2026
आशा ताईंच्या निधनाने शाहरुख हळहळला
शाहरुख खानने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंट आशा भोसलेंसोबतचा फोटो शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.या पोस्टमध्ये अभिनेत्याने म्हटलंय, "आशाताईंच्या निधनाबद्दल समजताच दुःख झाले.त्यांचा आवाज हा भारतीय चित्रपटसृष्टीचा आधारस्तंभ राहिला आहे आणि येणाऱ्या कित्येक शतकांपर्यंत तो जगभर निनादत राहील.अनेक पिढ्यांच्या पलीकडेही टिकून राहणारी एक अलौकिक प्रतिभा. त्यांनी माझ्यावर सदैव आशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव केला; मला तुमची नक्कीच उणीव भासेल. तुमच्या आत्म्यास शांती लाभो, आशाताई... तुमच्यावर खूप प्रेम आहे."
आशा भोसले यांनी त्यांच्या कारकिर्दीत एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते अलिकडच्या तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला. आशा भोसले यांच्या निधनाने कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.