'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:21 IST2025-06-09T16:18:32+5:302025-06-09T16:21:53+5:30

'छावा'नंतर लक्ष्मण उतेकरांच्या नवीन सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार, असं बोललं जातंय

laxman utekar direct biopic based on lavani dancer vithabai narayangaonkar shraddha kapoor will seen | 'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका

'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका

'छावा' सिनेमा चांगलाच गाजला. याचवर्षी अर्थात २०२५ ला रिलीज झालेला 'छावा' सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गाजला. या सिनेमाच्या माध्यमातून मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा स्वतःची छाप पाडली. 'छावा' सारखा सुपरहिट सिनेमा देणारे लक्ष्मण उतेकर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीतील तमाशा कलावंताचा जीवनपट प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रमुख भूमिका साकारणार अशी चर्चा आहे

'छावा'नंतर लक्ष्मण उतेकरांचा नवीन सिनेमा

Tv 9 ने दिलेल्या रिपोर्टनुसार लक्ष्मण उतेकर महाराष्ट्रातील दिग्गज तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावरील आधारीत सिनेमा बनवणार आहेत. या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. यानिमित्ताने श्रद्धा कपूर पहिल्यांदाच अशा भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अजून याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाहीये. पण तरीही लक्ष्मण उतेकर या सिनेमाच्या प्राथमिक तयारीत सध्या व्यस्त आहेत, असं सांगण्यात येत आहे.

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या महाराष्ट्रातील दिग्गज लावणी सम्राज्ञी आणि तमाशा कलावंत होत्या. त्यांनी महाराष्ट्रातील गावागावात तमाशाचा प्रचार आणि प्रसार केला. विठाबाईंचं व्ययक्तिक आयुष्य मात्र खूप खडतर होतं. 'तमाशा: विठाबाईच्या आयुष्याचा' या पुस्तकावर हा सिनेमा आधारीत असणार असं बोललं जातंय. 'छावा'नंतर लक्ष्मण उतेकर या सिनेमातून कशी कमाल करणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल. याशिवाय श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका कशी साकारणार, हे पाहणंही रंजक ठरणार आहे. लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा होईल.

Web Title: laxman utekar direct biopic based on lavani dancer vithabai narayangaonkar shraddha kapoor will seen