Tanmay Bhat : गजब! ललित मोदी-सुष्मिता सेनच्या रोमॅन्टिक फोटोला कॉमेडियन तन्मय भटने दिला धम्माल ट्विस्ट !!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 05:48 PM2022-07-17T17:48:23+5:302022-07-17T17:49:25+5:30

Lalit Modi and Sushmita Sen relationship, Tanmay Bhat : ललित मोदी व सुष्मिता सेनच्या लव्ह अफेअरवर कॉमेडियन तन्मय भटनं शेअर केलेला फोटो पाहून हसू आवरणार नाही...!!

Lalit Modi and Sushmita Sen relationship comedian Tanmay Bhat recreates new scene | Tanmay Bhat : गजब! ललित मोदी-सुष्मिता सेनच्या रोमॅन्टिक फोटोला कॉमेडियन तन्मय भटने दिला धम्माल ट्विस्ट !!

Tanmay Bhat : गजब! ललित मोदी-सुष्मिता सेनच्या रोमॅन्टिक फोटोला कॉमेडियन तन्मय भटने दिला धम्माल ट्विस्ट !!

googlenewsNext

आयपीएलचे माजी चेअरमन व बिझनेसमन ललित मोदी (Lalit Modi )आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन  (Sushmita Sen ) यांच्या अफेअरची चर्चा सध्या जोरात आहे. मी सुष्मिताला डेट करतोय, असं ललित मोदींनी जाहीर केलं आणि यानंतर दोघांच्या नात्याची एकच चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर तर या लव्हअफेअरनं नुसता धुमाकूळ घातला आहे. कुणी या अफेअरवरचे वेगवेगळे मीम्स व्हायरल होत आहेत, कुणी यावरून सुष्मिता व ललित मोदींना ट्रोल करत आहेत. अशात कॉमेडियन तन्मय भट (Tanmay Bhat) याने एक पाऊल पुढे टाकत, सुष्मिता व ललित यांच्या एका रोमॅन्टिक फोटोला एक वेगळाच धम्माल ट्विस्ट दिला आहे. 

 ललित यांनी सुष्मितासोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो शेअर केले होते. यापैकी एका फोटोला कॉमेडी ट्विस्ट देत तन्मयने तसाच फोटो आपल्या फ्लॅटमेट्ससोबत रिक्रिएट केला आहे.  

ललित व सुष्मिताच्या फोटोतील पोझ कॉपी करत, तन्मयने अगदी तसाच फोटो शेअर केला आहे. यात तन्मय सोफ्यावर झोपलेला दिसत आहे आणि त्याचा रूममेट नवीद त्याच्या बाजूला बसला आहे. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघून हसत आहेत.  या फोटोला तन्मयने ललित मोदींनी दिलेल्या कॅप्शनसारखं सेम टू सेम कॅप्शन दिलं आहे.

‘एक नवं आयुष्य, एक नवी सुरुवात. प्रेम आहे पण याचा अर्थ लग्न झालं असं नाही. पण ते ही देवाच्या कृपेने एक दिवस नक्की होईल. आत्ता मी अशी घोषणा करू इच्छितो की आम्ही दोघे फ्लॅटमेट्स,’ असं कॅप्शन तन्मयने या फोटोला दिलं आहे. 
तन्मय भटच्या या भन्नाट कल्पनेचं सध्या चांगलंच कौतुक होत आहे. त्याच्या या भन्नाट कल्पनेचं भयानक कौतुक होताना दिसत आहे.

Web Title: Lalit Modi and Sushmita Sen relationship comedian Tanmay Bhat recreates new scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.