मुंबईच्या रस्त्यावर धावणार लक्ष्य लालवानीची नवी लक्झरी कार, मोजले 'इतके' पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:33 IST2025-10-30T12:33:02+5:302025-10-30T12:33:26+5:30

लक्ष्यची नवी कार तिच्या स्पोर्टी लूक आणि हाय-टेक फीचर्समुळे ओळखली जाते.

Lakshya Lalwani Buys Sports Car Mg Cyberster After The Bads Of Bollywood Success | मुंबईच्या रस्त्यावर धावणार लक्ष्य लालवानीची नवी लक्झरी कार, मोजले 'इतके' पैसे

मुंबईच्या रस्त्यावर धावणार लक्ष्य लालवानीची नवी लक्झरी कार, मोजले 'इतके' पैसे

Lakshya Lalwani Buys Mg Cyberster: बॉलिवूडमधला उभरता कलाकार म्हणून अभिनेता लक्ष्य लालवानी सध्या नावारुपाला येत आहे. आधीकरण जोहरच्या 'किल' सिनेमातून डेब्यू करत त्याने अभिनयाचं आणि अ‍ॅक्शन कौशल्यही दाखवलं. तर नुकताच तो आर्यन खानच्या बहुचर्चित 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसला. यातही त्याच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होत आहे. द बॅड्स ऑफ बॉलीवूड' च्या जबरदस्त यशानंतर, लक्ष्यने स्वतःला एक खास आणि आलिशान भेट दिली आहे. लक्ष्यने एक आकर्षक नवीन लाल रंगाची स्पोर्ट्स कार खरेदी केली.

लक्ष्य नुकतंच आपली गाडी मुंबईच्या रस्त्यांवर चालवताना दिसला. लक्ष्य लालवानीने जी नवी स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे, ती आहे MG Cyberster. ही कार तिच्या स्पोर्टी लूक आणि हाय-टेक फीचर्समुळे ओळखली जाते. लक्ष्यच्या या स्टायलिश स्पोर्ट्स कारची किंमत अंदाजे ८० लाख आहे. आपल्या नव्या गाडीसोबत लक्ष्यनं पापाराझींना खास पोझही दिल्या. यावेळी तो राखाडी टी-शर्ट, काळी पँट, गॉगल आणि टोपी अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसला.


 MG Cybersterचे फीचर्स

लक्ष्य लालवानी ही नवीकोरी MG Cyberster  ही स्पोर्ट सुपर कार असल्याने कमी उंचीची आहे. या कारचा व्हीलबेस हा २,६९० मिमी आहे. कन्वर्टिबल बॉडी स्टाइल असल्याने या कारचा रुफ उघडता येणार आहे. एमजी सायबरस्टरमध्ये ड्युअल-मोटर AWD सेटअप आहे, जो ३७५kW आणि ७२५Nm टॉर्क निर्माण करतो. ३.२ सेकंदात ही कार १०० चा वेग गाठते. लेव्हल २ एडीएएस, रिअल-टाइम ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम, चार एअरबॅग्ज, ईएससी आणि इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक अशी सेफ्टी फिचर देण्यात आली आहेत. या कारमध्ये आठ-स्पीकर, ३२०W बोस ऑडिओ सिस्टम देण्यात येत आहे. यामुळेच ही कार आता सेलिब्रिटींची नवी पसंती बनत आहे.
 

Web Title: Lakshya Lalwani Buys Sports Car Mg Cyberster After The Bads Of Bollywood Success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.