फूल कुमारीच्या 'या' सीनवेळी दिग्दर्शक किरण रावला रडू कोसळलं; 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 17:25 IST2024-12-30T17:25:25+5:302024-12-30T17:25:52+5:30

'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीने नितांशी गोयलने सेटवर तिला आलेला भावुक अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय

laapata ladies movie director kiran rao emotional phul kumari nitanshi goel | फूल कुमारीच्या 'या' सीनवेळी दिग्दर्शक किरण रावला रडू कोसळलं; 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीने सांगितला किस्सा

फूल कुमारीच्या 'या' सीनवेळी दिग्दर्शक किरण रावला रडू कोसळलं; 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीने सांगितला किस्सा

'लापता लेडीज' सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. हा सिनेमा २०२४ मधील महत्वपूर्ण सिनेमा म्हणून ओळखला गेला. इतकंच नव्हे तर भारतातर्फे हा सिनेमा ऑस्करलाही पाठवण्यात आला होता. परंतु सिनेमाला ऑस्करमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. 'लापता लेडीज' सिनेमात सर्व नवखे कलाकार असूनही त्यांच्या अभिनयाने सिनेमाला चार चाँद लागले. 'लापता लेडीज' सिनेमात फूल कुमारीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नितांशी गोयलने 'लापता लेडीज'च्या सेटवरचा भावुक किस्सा सांगितला.

'लापता लेडीज'मधील या सीन वेळेस सर्वजण झालेले भावुक

फ्री प्रेस जर्नलशी बोलताना नितांशी गोयल म्हणाली की, सिनेमातील एक सीन स्क्रीप्टचा भाग नव्हता. परंतु नितांशीने स्वतः कल्पना दिल्याने हा सीन सिनेमात रचण्यात आला. तो म्हणजे जेव्हा फूल कुमारी रेल्वे स्टेशनमधील शौचालयात रडते. फूल कुमारीची व्यक्तिरेखा मनातून किती खचलीय हे दाखवण्यासाठी हा सीन गरजेचा होता. स्वतः नितांशीने सांगितल्याप्रमाणे दिग्दर्शक किरण रावने स्क्रीप्टमध्ये थोडा बदल करुन हा सीन शूट केला. 

नितांशीने उत्कट अभिनय करुन हा इमोशनल सीन खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केला. या सीननंतर 'लापता लेडीज'ची संपूर्ण टीम इमोशनल झाली होती. सेटवर उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून नितांशीचं स्वागत केलं. अनेकजणांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. स्वतः दिग्दर्शक किरण रावच्या डोळ्यातून अश्रू ओघळले होते. 'लापता लेडीज' हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्स या ओटीटीवर रिलीज झाला असून सिनेमाला जगभरातील प्रेक्षकांनी प्रेम दिलं.

 

Web Title: laapata ladies movie director kiran rao emotional phul kumari nitanshi goel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.