Laal Singh Chaddha : ‘लाल सिंग चड्ढा’साठी ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने किती मानधन घेतलं माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 10:31 IST2022-08-11T10:28:31+5:302022-08-11T10:31:18+5:30

Laal Singh Chaddha : ‘लालसिंग चड्ढा या चित्रपटात आमिर व करिना दोघं लीड रोलमध्ये आहेत. चित्रपट रिलीज झाला आहे आणि आता सिनेमाच्या स्टारकास्टने घेतलेल्या मानधनाची चर्चा रंगली आहे. 

Laal Singh Chaddha aamir khan kareena kapoor naga chaitanya mona singh fees | Laal Singh Chaddha : ‘लाल सिंग चड्ढा’साठी ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने किती मानधन घेतलं माहितीये?

Laal Singh Chaddha : ‘लाल सिंग चड्ढा’साठी ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने किती मानधन घेतलं माहितीये?

अखेर प्रतीक्षा संपली. आमिर खानकरिना कपूरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आज रिलीज झाला आहे. रिलीजआधी या चित्रपटाला विरोध झाला. सोशल मीडियावर #BoycottLaalSinghChaddha  ट्रेंड झाला. यामुळे आमिर खान प्रचंड नर्व्हस होता. आमिरची झोप उडाली होती. पण चित्रपट रिलीज झाल्यावर प्रेक्षकांचं मत बदलल्याचं चित्र आहे. होय, चित्रपट प्रेक्षकांना आवडला आहे आणि आता #GlobalLoveForLaalSingh व  #BetterThanTheOriginal  ट्रेंड होत आहे. या चित्रपटात आमिर व करिना दोघं लीड रोलमध्ये आहेत. मोना सिंग व नागा चैतन्यही चित्रपटात आहेत. चित्रपट रिलीज झाला आहे आणि आता सिनेमाच्या स्टारकास्टने घेतलेल्या मानधनाची चर्चा रंगली आहे. 

आमिर खान
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानपासून सुरूवात करू या. रिपोर्टनुसार, आमिरने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत केली, तेवढीच तगडी फी सुद्धा वसूल केली. होय, आमिरने या सिनेमासाठी 50 कोटी रूपये चार्ज केल्याचं कळतेय.
 
करिना कपूर
बेबो या चित्रपटात आमिरच्या अपोझिट आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी करिनाने 8 कोटी रूपये मानधन घेतलं आहे.

नागा चैतन्य
साऊथ स्टार नागा चैतन्य या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्याने रितेश जोशी नामक भूमिका साकारली आहे. या चित्रपटाद्वारे नागा चैतन्य बॉलिवूड डेब्यू केला आहे. या चित्रपटासाठी त्याने 6 कोटी मानधन घेतलं आहे.

मोना सिंग
मोना सिंगने या चित्रपटात आमिर खानच्या आईची भूमिका साकारली आहे. ट्रेलर समोर आला तेव्हापासून मोना सिंगच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. या चित्रपटासाठी मोनाने 2 कोटी रूपये चार्ज केल्याचं कळतंय.
‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची स्पर्धा अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’सोबत आहे. होय, अक्षयचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट सुद्धा आजच रिलीज झाला आहे. आता या दोन्ही चित्रपटांपैकी प्रेक्षकांना कोणता चित्रपट आवडतो आणि कोणता चित्रपट सर्वाधिक बिझनेस करतो, ते बघूच.
 

Web Title: Laal Singh Chaddha aamir khan kareena kapoor naga chaitanya mona singh fees