'आमचं कॅलेंडर हरवलं यार...', सतीश कौशिक यांच्या निधनाने कुशल बद्रिके भावूक; शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 14:06 IST2023-03-09T14:03:41+5:302023-03-09T14:06:16+5:30
अभिनेता सतीश कौशिक म्हणलं की तो हसवणारा मिस्टर इंडिया मधला 'कॅलेंडर' डोळ्यासमोर येतो.

'आमचं कॅलेंडर हरवलं यार...', सतीश कौशिक यांच्या निधनाने कुशल बद्रिके भावूक; शेअर केली पोस्ट
Satish Kaushik : अभिनेता सतीश कौशिक म्हणलं की तो हसवणारा 'मिस्टर इंडिया' मधला 'कॅलेंडर' डोळ्यासमोर येतो. त्यांनी अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. आज ६६ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. यामुळे मनोरंजनसृष्टी हळहळली आहे. हिंदीच नाही तर मराठी कलाकारही आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री हेमांगी कवी यांच्यानंतर आता अभिनेता कुशल बद्रिके यानेदेखील पोस्ट शेअर केली आहे.
सतीश कौशिक यांचं गाजलेलं कॅरेक्टर म्हणजे मिस्टर इंडिया मधला 'कॅलेंडर'. मात्र आता ते कॅलेंडरच हरवलं आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक पिढीला मिस्टर इंडिया सिनेमा तोंडपाठ असेल. त्यात कॅलेंडरवर तर विशेष प्रेम असणार. कुशल बद्रिकेलाही कॅलेंडरचीच आठवण झाली आहे. त्याने पोस्ट करत लिहिले, ' या वर्षी आमचं कॅलेंडर हरवलं यार...'
कॅलेंडरच्या जाण्याने सर्वच भावूक झाले आहेत. सिनेसृष्टीतून विनोदी कलाकार हरपला आहे. हे दु:ख कधीही भरुन न निघणारे आहे.
'नववर्षात फिट राहण्याचा केला होता संकल्प मात्र त्याआधीच...', सतीश कौशिक यांचा जिममधील Video व्हायरल
सतीश कौशिक हे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, कॉमेडियन आणि पटकथालेखक होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरून करिअरची सुरुवात केली होती. ‘मिस्टर इंडिया’, ‘दिवाना मस्ताना’, ‘ब्रिक लेन’, ‘साजन चले ससुराल’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर ‘रुप की रानी चोरों का राजा’, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल मे रहते है’, ‘तेरे नाम’ यांसारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं.