'कपिल शर्मा पैसे घेऊन करतो चित्रपटांचं प्रमोशन'; KRK ने केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 14:10 IST2021-12-21T14:06:09+5:302021-12-21T14:10:50+5:30

Kapil sharma: अलिकडेच केआरकेने रणवीर सिंग स्टारर '83' या चित्रपटाच्या ट्रेलरवर टीका केली होती. त्यानंतर आता कपिल शर्मावर टीकास्त्र डागलं आहे.

krk claimed that kapil sharma charges 25 to 30 lakh rupees to promote a film on his show | 'कपिल शर्मा पैसे घेऊन करतो चित्रपटांचं प्रमोशन'; KRK ने केले गंभीर आरोप

'कपिल शर्मा पैसे घेऊन करतो चित्रपटांचं प्रमोशन'; KRK ने केले गंभीर आरोप

स्वयंघोषित चित्रपट व्यापार विश्लेषक कमाल आर खान(KRK) त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतो. आतापर्यंत केआरकेने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर टीकास्त्र डागलं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या केआरकेने आता कपिल शर्मावर (Kapil Sharma) टीकेची झोड उठवली आहे. 'कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावण्यासाठी प्रत्येक कलाकाराला पैसे द्यावे लागतात', असं ट्विट करत केआरकेने  म्हटलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर केआरके आणि कपिल शर्मा या दोघांची चर्चा रंगली आहे. 

अलिकडेच केआरकेने रणवीर सिंग स्टारर '83' या चित्रपटाच्या ट्रेलरवर टीका केली होती. हा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यासाठी निर्मात्यांनी १ कोटी रुपये दिले होते असं म्हटलं होतं. त्यानंतर आता त्याने कपिल शर्मावर टीकास्त्र डागलं आहे. कपिल शर्मा त्याच्या 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी पैसे घेतो असं त्याने म्हटलं आहे.

'कपिल शर्मा शो'मध्ये जाणं सोनाली कुलकर्णीला पडलं महागात; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

काय आहे केआरकेचं ट्विट

केआरकेने केलेल्या ट्विटमध्ये त्याने कपिल शर्मा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मोठी रक्कम आकारतो असं म्हटलं आहे. "कपिल शर्मा शोमध्ये चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी तो २५ ते ३० लाख रुपये फी घेतो.  मला वाटतं प्रत्येक कलाकार कपिल शर्मा शोमध्ये त्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी जातात. परंतु, कपिलच्या शोमध्ये चित्रपटांचं प्रमोशन केल्यामुळे फारसा काही फरक पडत नाही."

पुढे तो म्हणतो, "कपिल शर्मा एक बिचारा विनोदवीर आहे. एक लहानसा अभिनेता. त्यामुळे जर कोणत्याही मोठ्या चित्रपटाचं प्रमोशन करायचं असेल तर निर्मात्यांना ५० लाख रुपये द्यावे लागतात. त्यामुळे आता मी कोणत्या मोठ्या स्टारविषयी बोलतोय हे तुम्हाला समजलंच असेल."

दरम्यान, केआरकेने या ट्विटमधून कपिल शर्माबरोबरच अभिनेता सलमान खानवरही अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. कारण, अनेकदा सलमानच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये चित्रपटांचं प्रमोशन केलं जातं.केआरके कायमच बॉलिवूड कलाकारांवर टीकास्त्र डागत असतो. यापूर्वी त्याने कंगना रणौत, प्रियांका चोप्रा, मिका सिंग यांसारख्या सेलिब्रिटींविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 
 

Web Title: krk claimed that kapil sharma charges 25 to 30 lakh rupees to promote a film on his show