कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:58 IST2025-12-10T12:57:52+5:302025-12-10T12:58:44+5:30
करण कुंद्रासोबत ब्रेकअपनंतर अनेक वर्षांनी कृतिका कामरा पुन्हा प्रेमात, ७ वर्ष मोठ्या सेलिब्रिटीला करतेय डेट

कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
'इतनी मोहोब्बत है'फेम अभिनेत्री कृतिका कामराने जाहीररित्या प्रेमाची कबुली दिली आहे. क्रिकेट होस्ट आणि कंटेंट क्रिएटर गौरव कपूरला ती डेट करत आहे. कृतिकाने याआधी ती रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंट दिली होती. तर आता तिने गौरवसोबतचे फोटो शेअर करत रिलेशिनशिप कन्फर्म केली आहे. त्यांचे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
कृतिका कामराने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. 'ब्रेकफास्ट विथ...' असं कॅप्शन तिने दिलं आहे. यामध्ये तिने गौरवचा कँडीड फोटो आणि स्वत:चा सेल्फी घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. सोबतच ब्रेकफास्ट मेन्यूची झलक दाखवली आहे. यानंतर तिने गौरवसोबत शूजचा फोटो पोस्ट कला आहे. कपल गोल्स देणारा हा फोटो आहे. तर 'बबीज' असं लिहिलेले दोन टी कप घेत चिअर्स करतानाचा व्हिडीओही तिने पोस्ट केला आहे.
कृतिकाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत लिहिले, 'तुम्ही डेट करताय? ओएमजी ','दोघंही माझे आवडते सेलिब्रिटी'. नेटकऱ्यांनी कपलवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तर अंगद बेदी, श्रेया धन्वंतरी यांनी दोघांचं अभिनंदन केलं आहे.
कृतिका कामरा काही वर्षांपूर्वी करण कुंद्राला डेट करत होती. दोघांच्या अफेअरची आणि नंतर ब्रेकअपची खूप चर्चा झाली. गेल्यावर्षी कृतिका 'ग्यारह ग्यारह' सीरिजमध्ये दिसली. तर आता तिचा 'द ग्रेट शमशुद्दीन फॅमिली' सिनेमा रिलीज होणार आहे. गौरव कपूर कृतिकाहून ७ वर्षांनी मोठा आहे.