होम क्वारंटाईनमध्ये क्रितीला आली सुशांतची आठवण, बघा काय करतीये ती....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 16:29 IST2020-12-10T16:29:18+5:302020-12-10T16:29:49+5:30
या रिकाम्या वेळेत ती काय करतेय याची झलक तिने दाखवली आहे. तिने इन्स्टास्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात स्क्रीनवर 'राब्ता'सिनेमाचा सीन दिसत आहे.

होम क्वारंटाईनमध्ये क्रितीला आली सुशांतची आठवण, बघा काय करतीये ती....
अभिनेत्री क्रिती सेनन नुकतीच कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. सध्या ती होम क्वारंटाइन आहे. घरीच आपला वेळ घालवत आहे. या रिकाम्या वेळेत ती काय करतेय याची झलक तिने दाखवली आहे. तिने इन्स्टास्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात स्क्रीनवर 'राब्ता'सिनेमाचा सीन दिसत आहे.
क्रिती कोरोनाची शिकार होऊन दोनच दिवस झाले आहेत. त्यामुळे ती घरीच क्वारंटाइन असून घरीच उपचार घेत आहे. घरी राहून टाइमपास करण्यासाठी ती तिचा सुशांतसोबतचा 'राब्ता' सिनेमा बघत होती आणि याच्या एका सीनचा फोटो तिनने इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. सोबतच लिहिले आहे की, शिव आणि सायरा बऱ्याच दिवसांनी....
क्रिती सेनन आणि सुशांतमध्ये 'राब्ता' सिनेमावेळी चांगली मैत्री झाली होती. इतकेच काय तर दोघांच्या लिंकअपची चर्चाही होऊ लागली होती. सुशांत नुपूर सेननचाही चांगला मित्र होता. तिघांचे काही फोटो सोशल मीडियावर बघायला मिळालेत.
क्रिती सेननने कोरोनाची लागण झाल्यावर याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. तिने लिहिले होते की, 'मला सर्वांना सांगायचं आहे की, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. चिंता करण्याची गरज नाही. कारण मी पूर्णपणे ठीक आहे आणि बीएमसी व डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. तर मी या वादळासोबत लढत आहे. लवकरच कामाला सुरूवात करेन'.