लंडनच्या रस्त्यावर बिझनेसमन बॉयफ्रेंडसोबत फिरतेय क्रिती सनॉन, ९ वर्ष मोठी आहे अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 12:48 IST2026-02-22T12:48:13+5:302026-02-22T12:48:58+5:30
कोण आहे क्रितीचा बॉयफ्रेंड?

लंडनच्या रस्त्यावर बिझनेसमन बॉयफ्रेंडसोबत फिरतेय क्रिती सनॉन, ९ वर्ष मोठी आहे अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन बिझनेसमन कबीर बहियाला डेट करत आहे. अनेकदा ती कबीरसोबत व्हेकेशनवर दिसली आहे. तसंच क्रितीची बहीण नुपूरच्या लग्नातही कबीर बहिया आला होता. क्रितीने इन्स्टाग्रामवर कबीरसोबतचे फोटो पोस्ट करत त्यांचं नातं जवळपास ऑफिशियलच केलं आहे. आता नुकतंच क्रितीचा कबीर सोबत लंडनमधला व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये क्रिती आणि कबीर हातात हात घालून लंडनच्या रस्त्यावर फिरत आहेत.
रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेलिब्रिटींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच एक म्हणजे कबीर आणि क्रिती सनॉन यांचा लंडनच्या रस्त्यावर निवांत फिरतानाचा व्हिडीओ आला आहे. दोघंही हातात हात घालून चालत आहेत. क्रितीने डार्क ब्राऊन स्वेटशर्ट त्यावर जॅकेट आणि ब्लू जीन्स घातली आहे. तर कबीर कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.
Kriti Sanon Spotted with her Boyfriend Kabir in London
by u/bollyfanboi in BollyBlindsNGossip
कबीर बहियाचं एम एस धोनीशीही जवळचं नातं आहे. धोनीची पत्नी साक्षीच्या तो नात्यातला आहे. अनेकदा धोनीच्या कुटुंबासोबतही कबीर आणि क्रितीचे फोटो समोर आले आहेत. विशेष म्हणजे क्रिती ही कबीरहून ९ वर्षांनी मोठी आहे. क्रिती ३५ वर्षांची तर कबीर २६ वर्षांचा आहे.
कोण आहे कबीर बहिया?
कबीर बहिया हा एक ब्रिटीश व्यापारी असून त्याने आपले शालेय शिक्षण इंग्लंडमधील बोर्डिंग स्कूलमधून केले आहे. तो वर्ल्डवाइड एव्हिएशन अँड टुरिझम लिमिटेडचे संस्थापक देखील आहे. यूके स्थित ट्रॅव्हल एजन्सी साउथॉल ट्रॅव्हलचे मालक कुलजिंदर बहिया यांचा तो मुलगा आहे.