'कॉफी विथ करण 8' मध्ये क्रिती सनॉन लावणार हजेरी? अभिनेत्रीने दिली ही हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 16:44 IST2023-10-31T16:40:08+5:302023-10-31T16:44:52+5:30

'कॉफी विथ करण 8' मध्ये क्रिती सनॉन हजेरी लावणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

Kriti Sanon to appear in 'Koffee with Karan 8'? The actress gave hint | 'कॉफी विथ करण 8' मध्ये क्रिती सनॉन लावणार हजेरी? अभिनेत्रीने दिली ही हिंट

'कॉफी विथ करण ८' मध्ये क्रिती सनॉन लावणार हजेरी? अभिनेत्रीने दिली ही हिंट

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा  सर्वात लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण 8'  हा सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. करणच्या या टॉक शोवर वेगवेगळे बॉलिवूडसेलिब्रिटीज हजेरी लावतात आणि धमाल गप्पा-गॉसिप करतात. या सीझन 8 मध्ये अभिनेत्री क्रिती सनॉन हजेरी लावणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

क्रिती सनॉनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, “सर्व कॉफी प्रेमींसाठी!  तुम्हाला माहितेय मला काय म्हणायचे आहे'. तिच्या या पोस्टमुळे ती 'कॉफी विथ करण 8' मध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी हजेरी लावली होती. आता दुसऱ्या एपिसोडमध्ये देओल ब्रदर्स हजेरी लावणार आहेत. तर तिसऱ्या एपिसोडमध्ये क्रिती सनॉन पाहायला मिळणार असा अंदाज चाहते वर्तवत आहेत. 

क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अलीकडेच 'गणपत'मध्ये टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होती. या सिनेमासाठी तिनं खास  ननचाकू, डर्ट बाईक, किकबॉक्सिंगचं प्रशिक्षण घेतलं होतं. नुकतेच क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.  क्रितीने 'मिमी' या सिनेमात साकारलेली आई मनाला भावून जाणारी आहे. अतिशय भावूक अशा या कहाणीत क्रितीने जीव ओतून काम केलं आहे. त्याचंच फळ तिला मिळालं.

Web Title: Kriti Sanon to appear in 'Koffee with Karan 8'? The actress gave hint