OMG! लेकीने शेअर केले बिकिनी फोटो, ट्रोल झाला जॅकी श्रॉफ; सलमान खान ठरला कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 15:49 IST2021-05-17T15:48:10+5:302021-05-17T15:49:49+5:30
पापाला सलमानपासून दूर राहायला सांगत, नाही तर पुढच्या सिनेमात सलमान त्यांनाही बिकिनी घालायला लावेल, अशा शब्दांत एका युजरने जॅकीला ट्रोल केले आहे.

OMG! लेकीने शेअर केले बिकिनी फोटो, ट्रोल झाला जॅकी श्रॉफ; सलमान खान ठरला कारण
जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff Photos)किती हॉट आणि बोल्ड आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर गेलात की, तिच्या बोल्डनेसचा अंदाज येईलच. तूर्तास कृष्णाच्या बिकिनी फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. मरून कलरच्या या बिकिनी फोटोंमध्ये कृष्णा तिचे एब्ज व टॅटू फ्लॉन्ट करताना दिसतेय. अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंचे कौतुक केलेय. अर्थातच ट्रोल करणारेही आहेत. या ट्रोलर्सनी कृष्णाला जबरदस्त ट्रोल केलेय. विशेष म्हणजे, तिच्यासोबत तिचे डॅड जॅकी श्रॉफही (Jackie Shroff) सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
पापाला सलमानपासून दूर राहायला सांगत, नाही तर पुढच्या सिनेमात सलमान त्यांनाही बिकिनी घालायला लावेल, अशा शब्दांत एका युजरने जॅकीला ट्रोल केले आहे. आता जॅकीला सलमानपासून दूर राहण्याचा सल्ला का दिला जातोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर याचे कारण आहे, नुकताच रिलीज झालेला ‘राधे-योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा.
जॅकी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...
तर ‘राधे-योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमातील एका सीनमध्ये 64 वर्षीय जॅकी श्रॉफ अशा कपड्यात दिसतो, ज्याची तुम्ही आम्ही कल्पनाही करू शकत नाही. होय, सिनेमात एका गाण्यात जॅकी स्लिंकी रेड ड्रेसमध्ये नाचताना दिसतो. हे गाणे तसे सलमान व दिशा पाटनीवर चित्रीत केले गेले आहे. मात्र मध्येच जॅकी दिशाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतो.या सीनमुळे आणि जॅकीच्या कपड्यांमुळे जॅकी सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतोय. या सीनची आणि अशा कपड्यांची गरजच काय होती? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती जॅकी, अशा शब्दांत लोक जॅकीला ट्रोल करत आहेत.
कृष्णाने बिकिनी फोटो शेअर करताच, लोकांनी तिला ट्रोल करताना जॅकीलाही गुंडाळले, ते याचमुळे.