Koffee With Karan 7: "हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण..."; गौरी खानचा आर्यनला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:21 PM2022-09-27T12:21:25+5:302022-09-27T12:22:33+5:30

Koffee With Karan Season 7: बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' या सेलिब्रिटी मुलाखतीच्या कार्यक्रमाचं सध्या सातवं सीझन सुरू आहे.

Koffee With Karan 7 Date as many girls as you want but Gauri Khans advice to Aryan khan | Koffee With Karan 7: "हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण..."; गौरी खानचा आर्यनला सल्ला

Koffee With Karan 7: "हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण..."; गौरी खानचा आर्यनला सल्ला

googlenewsNext

Koffee With Karan Season 7: बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' या सेलिब्रिटी मुलाखतीच्या कार्यक्रमाचं सध्या सातवं सीझन सुरू आहे. बॉलीवूडचा 'किंग' अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खान (Gauri Khan) हिनं उपस्थिती लावली. एक-दोन नव्हे, तर तब्बल १७ वर्षांनी गौरी खान 'कॉफी विथ करण' या शोमध्ये सहभागी झाली होती. करण जोहरनं विचारलेल्या प्रश्नांना गौरी खाननं अगदी बेधडक उत्तरं दिली. यात आपल्या मुलांबाबत केलेल्या विधानांनी विशेष लक्ष वेधलं. 

त्यापेक्षा वाईट काहीच...., आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर गौरी खान पहिल्यांदाच बोलली

आर्यन खानला कोणता सल्ला देशील असं गौरी खानला विचारण्यात आलं असता तिनं स्पष्ट शब्दांत आर्यनच्या रिलेशनशीपच्या बाबतीत वक्तव्य केलं.  "तू हवं तितक्या मुलींना डेट कर, पण लग्न करण्याचा निर्णय घेईपर्यंतच. लग्न झाल्यावर डेटिंग नाही", असा सल्ला गौरी खान हिनं मुलगा आर्यन याला देऊ केला आहे. तसंच आर्यन आणि सुहाना या दोघांमध्ये जास्त फॅशनेबल कोण आहे?, असं विचारण्यात आलं असता गौरी खाननं आर्यनचच नाव घेतलं. 

गौरी खाननं लेक Suhana Khanला डेटिंगच्या बाबतीत दिला सल्ला, म्हणाली - 'एकावेळी दोन मुलांना...'

"आर्यन त्याच्या कपड्यांबाबत खूप सिलेक्टीव्ह असतो. त्याला शर्ट घालणं आवडत नाही. मला ज्याप्रकारे फुल स्लीव्हज घालणं आवडत नाही. तसंच त्यालाही अनेक गोष्टी आवडत नाहीत. कपड्यांबाबत तो नेहमी खूप लक्ष देऊन असतो", असं गौरी खान म्हणाली. 

'तो' काळ अत्यंत कठीण
आर्यनला ऑक्टोबर 2021मध्ये मुंबई क्रुज ड्रग्ज केस प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तो अनेक दिवस जेलमध्ये होता. परंतु, नंतर एनसीबी या प्रकरणात त्याला क्लीन चीट दिली. आर्यन तुरुंगात असताना शाहरूखची  तहानभूक, झोप सर्व उडाली होती. आई गौरी खानची अवस्थाही वेगळी नव्हती. या सगळ्या प्रकरणावर शाहरूख वा गौरी कधीही काही बोलले नव्हते. करणच्या शोमध्ये गौरी खान पहिल्यांदाच यावर व्यक्त झाली.

काय सांगता? गौरी खानला आहे ‘ही’ वाईट सवय...!  लेक सुहानानेच केली पोलखोल

"तो काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. ज्या प्रसंगातून आम्ही गेलो आहोत, त्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. पण आम्ही एक कुटुंब म्हणून एकमेकांसोबत उभे आहोत. आम्हाला सगळ्यांनाच एकमेकांप्रती प्रेम आहे. आता आम्ही कोणत्याही प्रसंगाचा मिळून धीराने सामना करू शकतो. या कठीण प्रसंगात अनेक मित्र-मैत्रिणी आमच्याबरोबर होते. परंतु, ज्यांना आम्ही ओळखत नव्हतो अशाही काही लोकांची साथ मिळाली. अनेकांचे मेसेज यायचे. या सगळ्यांची मी आभारी आहे", असं गौरी म्हणाली.

सुहानालाही दिला सल्ला
गौरी खाननं ज्यापद्धतीनं आर्यन खानला डेटिंगच्या बाबतीत सल्ला दिला. याच बाबतीत तिनं सुहानालाही सल्ला देऊ केला. "एकाच वेळी दोन मुलांना डेट करायचं नाही", असा माझा सुहानाला सल्ला राहिल असं गौरी खाननं म्हटलं होतं. गौरी खानला तीन मुलं आहेत. सुहाना, आर्यन आणि अबराम. तिघंही खूप लोकप्रिय आहेत. आर्यन खान चित्रपट निर्माता बनण्याच्या तयारीत असताना सुहाना खान झोया अख्तरच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील या चित्रपटाचा भाग असणार आहे.

Web Title: Koffee With Karan 7 Date as many girls as you want but Gauri Khans advice to Aryan khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.