प्रियांका चोप्राने जोनास आडनाव लावण्यामागचे सांगितले गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 06:00 IST2019-02-25T06:00:00+5:302019-02-25T06:00:01+5:30

कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमध्ये आजवर अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर येणार असून या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहर सोबत ते खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत.

Koffee With Karan 6: Priyanka Chopra added Nick Jonas’ last name due to this reason | प्रियांका चोप्राने जोनास आडनाव लावण्यामागचे सांगितले गुपित

प्रियांका चोप्राने जोनास आडनाव लावण्यामागचे सांगितले गुपित

ठळक मुद्देकॉफी विथ करण ६ या कार्यक्रमात करणने प्रियांकाला तू आता जोनास आहेस ना... असे देखील विचारले.यावर प्रियांकाने सांगितले, लग्न झाल्यानंतर निकने मला विचारले तुझे नाव काय आहे. त्यावर मी लगेचच प्रियांका चोप्रा जोनास असे म्हणाली

एकदा मुलीचे लग्न झाले की, ती तिच्या पतीचे आडनाव हे नावापुढे लावणार असेच भारतीय संस्कृतीत मानले जाते. पण आजच्या आधुनिक युगात अनेक मुली पतीचे आडनाव न लावता आपले केवळ माहेरचेच आडनाव लावणे पसंत करत आहेत. नुकतेच अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांचे लग्न झाले. दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत तर प्रियांकाने निक जोनास सोबत लग्न केले. या दोघांच्याही लग्नाची चर्चा चांगलीच रंगली होती. दीपिकाने लग्नानंतर देखील तिचे नाव दीपिका पादुकोण ठेवणेच पसंत केले आहे. पण प्रियांका आता तिचे नाव प्रियांका चोप्रा जोनास असे लावत असून तिने सोशल मीडियावरील तिच्या नावातही बदल केला आहे.

प्रियांका चोप्राने १ डिसेंबरला जोधपूर येथे धुमधडाक्यात निकसोबत लग्न केले. त्यानंतर काहीच दिवसांत तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिचे नाव प्रियांका चोप्रा जोनास असे तिने लिहिले. प्रियांकाने लग्न झाल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर नाव बदलल्यानंतर तिच्या फॅन्सना देखील आश्चर्याचा धक्का बसला होता. प्रियांकाने हा निर्णय का घेतला याबाबत तिने नुकतेच कॉफी विथ करण या कार्यक्रमात सांगितले आहे.

कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमध्ये आजवर अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर येणार असून या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहर सोबत ते खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत. या कार्यक्रमाच्या दरम्यान करण प्रियांका आणि करिनाची टर उडवण्याची एकही संधी सोडणार नाहीये. या कार्यक्रमात करणने प्रियांकाला तू आता जोनास आहेस ना... असे देखील विचारले. यावर प्रियांकाने सांगितले, लग्न झाल्यानंतर निकने मला विचारले तुझे नाव काय आहे. त्यावर मी लगेचच प्रियांका चोप्रा जोनास असे म्हणाली. त्यावर निक मान डोलावत अच्छा असे म्हणाला होता. त्या क्षणालाच मी माझे नाव असेच लावावे आणि सोशल मीडियावर देखील बदलावे असे ठरवले. 

 

Web Title: Koffee With Karan 6: Priyanka Chopra added Nick Jonas’ last name due to this reason