Koffee With Karan 6: करण जोहरने सुटाबुटाच्या किमतीवरून डिवचले! राजकुमार रावने सुनावले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 14:32 IST2019-01-22T14:28:26+5:302019-01-22T14:32:03+5:30

करणच्या ‘कॉफी विद करण’ या शोवर लवकरच अभिनेता राजकुमार राव हजेरी लावणार आहे. या एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आणि हा आगामी एपिसोड चर्चेत आला.

Koffee with Karan 6: karan johar says my suit costs as much as your emi rajkummar rao had a terrific response | Koffee With Karan 6: करण जोहरने सुटाबुटाच्या किमतीवरून डिवचले! राजकुमार रावने सुनावले!!

Koffee With Karan 6: करण जोहरने सुटाबुटाच्या किमतीवरून डिवचले! राजकुमार रावने सुनावले!!

करण जोहरचा ‘कॉफी विद करण’ या चॅट शोचे सहावे सीझन कायम चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आपल्या खासगी आयुष्याबद्दलचे खुलासे केलेत. यापैकी काही खुलाशांनी वाद निर्माण केला तर काही खुलाशांनी चाहत्यांचे मनोरंजन केले. करणच्या या शोवर लवकरच अभिनेता राजकुमार राव हजेरी लावणार आहे. या एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आणि हा आगामी एपिसोड चर्चेत आला.
होय, या प्रोमोमध्ये करण जोहर राजकुमारला असे काही डिवचून बोलला की, ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मग काय, राजकुमारनेही करणला रोखटोक उत्तर दिले. प्रोमोत करण जोहर आपल्या जोड्यांच्या, सूटाच्या किमतीवरून राजकुमारला डिवचतो. माझ्या जोड्यांची किंमत तुझ्या शाळेच्या फीपेक्षा अधिक आहे. माझ्या जॅकेटची किंमत तुझ्या ईएमआयपेक्षा जास्त आहे, असे करण राजकुमारला म्हणतो. यावर राजकुमार आपला हात दाखवत तुला ठाऊक आहे ना, ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची किंमत आहे, असे करणला सुनावतो. साहजिकच राजकुमारच्या या उत्तराने करणची ‘बोलती बंद’ होते.




चित्रपटात गे कॅरेक्टर साकारायचे असेल तर तू तुझ्या अपोझिट कुणाला घेशील? असा एक प्रश्नही करण राजकुमारला करतो. यावर राजकुमार अन्य कुणाचे नाही तर करणचेच नाव घेतो. तू ‘बॉम्बे वेल्वेट’नंतर कुठल्याच चित्रपटात अ‍ॅक्टिंग केली नाहीस ना? असा खोचक प्रतिप्रश्न करत राजकुमार दुसऱ्यांदा करणची ‘बोलती बंद’ करतो.




येत्या रविवारी करण व राजकुमारचा हा एपिसोड आॅन एअर होणार आहे. राजकुमारसोबत भूमी पेडणेकरही या शोमध्ये हजेरी लावणार आहे.
राजकुमारच्या चित्रपटांबद्दल म्हणाल तर लवकरच त्याचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीज होतोय. यात तो सोनम कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Web Title: Koffee with Karan 6: karan johar says my suit costs as much as your emi rajkummar rao had a terrific response