हिच्या प्रेमात वेडा आहे सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 21:23 IST2018-09-19T21:22:00+5:302018-09-19T21:23:57+5:30
बॉलिवूडचा अन्ना अर्थात सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. निर्माता साजिद नाडियाडवाना यांच्या चित्रपटातून अहानचा डेब्य होतोय. पण अहान मात्र डेब्यूआधीच चर्चेत आहे.

हिच्या प्रेमात वेडा आहे सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी!
बॉलिवूडचा अन्ना अर्थात सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. निर्माता साजिद नाडियाडवाना यांच्या चित्रपटातून अहानचा डेब्य होतोय. पण अहान मात्र डेब्यूआधीच चर्चेत आहे. होय, अहान व गर्लफ्रेन्ड तानिया श्रॉफ या दोघांच्या रोमान्सच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही महिन्यांत अहान व तानिया अनेकदा एकत्र दिसले. काल-परवाही हे दोघे लंच डेट एन्जॉय करताना दिसले. मीडियाने क्लिक करण्याचा प्रयत्न करताच तानियाने आपला चेहरा झाकून घेतला.
अहानची कथित गर्लफ्रेन्ड तानिया श्रॉफ ही बिझनेसमॅन जयदेव श्रॉफ यांची मुलगी आहे. तानियाने अमेरिकन स्कूल आॅफ बॉम्बेमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अर्थात तिचे बालपण मात्र मुंबईतचं गेले़. तानिया व अहान शाळेच्या दिवसांपासूनचे मिद्ध आहेत. तूर्तास तानिया लंडन स्कूल आॅफ फॅशनमधून फॅशन डिझाईनिंगचा कोर्स करतेय. तानिया केवळ ७ वर्षांची असताना तिचे आई-वडिल जयदेव आणि रोमिला एकमेकांपासून विभक्त झालेत. अतिशय अलिशान आयुष्य जगणाऱ्या तानियाचे अहानच्या कुटुंबासोबतही चांगले संबंध आहेत. तानियाचे अहान व्यतिरिक्त आथिया आणि अहानच्या आईबरोबर चांगले संबंध आहेत.