SEE PICS : सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 03:45 PM2017-08-05T15:45:45+5:302017-08-05T21:15:45+5:30

बॉलिवूडचा अण्णा अशी ओळख असलेला अभिनेता सुनील शेट्टी याचा लहान मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. साजिद ...

SEE PICS: Sunil Shetty's son, Ahaan Shetty, spotted with girlfriends! | SEE PICS : सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट!

SEE PICS : सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट!

googlenewsNext
लिवूडचा अण्णा अशी ओळख असलेला अभिनेता सुनील शेट्टी याचा लहान मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. साजिद नाडियाडवाला याच्या अ‍ॅक्शन चित्रपटातून तो बॉलिवूड प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे. परंतु तो त्याच्या डेब्यू चित्रपटापेक्षा गर्लफ्रेंडमुळेच अधिक चर्चेत आहे. नुकताच तो गर्लफ्रेंड तानिया श्रॉफ हिच्यासोबत लंच डेटवर असताना स्पॉट झाला. वास्तविक तानियाचा बॉलिवूड इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. तिचे वडील बिझनेसमॅन आहेत. परंतु तानियाचे सौंदर्य अन् ग्लॅमर बॉलिवूड अभिनेत्रींच्या तुलनेत कुठेच कमी नाही. 



तानिया शेट्टी परिवाराच्या खूप क्लोज आहे. अहानची बहीण आथिया शेट्टी हिची तर ती जीवलग मैत्रीण आहे. अहान आणि तानिया गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. अहान बºयाचदा तानियाच्या घरी स्पॉट झाला आहे. मात्र यावेळेस हे दोघे एका रेस्टॉरंटमध्ये वीकेंड एन्जॉय करताना बघावयास मिळाले. यावेळी तानियाने ब्लॅक क्रॉप टॉप परिधान केला होता. तर अहान पांढºया रंगाच्या फुल स्लीव शर्ट आणि ब्लॅक जीन्समध्ये बघावयास मिळाला. 





सुनील शेट्टी याला त्याच्या मुलाच्या गर्लफ्रेंडविषयी सर्व काही माहिती आहे. त्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘मी माझ्या मुलाच्या गर्लफ्रेंडविषयी जाणून आहे. तो मुलगा असल्याने त्याची मुलींशी मैत्री असणे स्वाभाविक आहे. मी त्याला मुलींचा आदर करणे शिकविले आहे. तीसुद्धा कोणाची तरी मुलगी आहे, हे तू विसरू नकोस हे मी त्याला सांगितले आहे. जर तुझा मुलीबरोबरचा व्यवहार ठीक नसेल तर तुला अशा काही अडचणींचा सामना करावा लागेल की, ज्यातून तुला कोणीच वाचवू शकणार नाही’, असेही मी माझ्या मुलाला सांगितले असल्याचे सुनीलने मुलाखतीत म्हटले होते. 



तानियाचे अहान व्यतिरिक्त आथिया आणि अहानच्या आईबरोबर चांगले संबंध आहेत. तानिया रिअल लाइफमध्ये खूपच ग्लॅमरस आहे. इन्स्टाग्रामवर ती नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करीत आहेत. विदेशातील तिच्या मित्रांसोबतचे तसेच बिकिनी फोटो इन्स्टावर धूम उडवून देत असतात. कदाचित यामुळेच ती सेलिब्रिटी नसतानाही तिच्या फॅन फॉलोअर्सची संख्या अधिक आहे. दरम्यान, अहानला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी अजय देवगण आणि सलमान खान यांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. 

Web Title: SEE PICS: Sunil Shetty's son, Ahaan Shetty, spotted with girlfriends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.