‘अण्णा’च्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे, अथिया व के. एल. राहुल बांधणार लग्नगाठ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 10:56 IST2022-04-20T10:52:41+5:302022-04-20T10:56:10+5:30
KL Rahul & Athiya Shetty : आलिया-रणबीरच्या बिग वेडिंगनंतर बॉलिवूडमध्ये आता पुन्हा एकदा लगीनघाई सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे. लवकरच अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल लग्न करणार आहेत. समोर आला वेडिंग प्लान...

‘अण्णा’च्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे, अथिया व के. एल. राहुल बांधणार लग्नगाठ!
KL Rahul & Athiya Shetty : बॉलिवूडचा ‘अण्णा’ सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul ) यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. सुरूवातीला दोघांनीही लपवून ठेवलं. पण शेवटी लपवून लपवून किती लपवणार? आताश: हे नातं जगजाहिर झालं आहे. दोघांनीही एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि आता हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, याच वर्षी डिसेंबरमध्ये अथिया व केएल लग्नगाठ बांधू शकतात. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.
अशी आहे चर्चा
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांची लेक अथिया बॉयफे्रन्ड के एल राहुलसोबत यावर्षी डिसेंबरपर्यंत लग्न करू शकते. दोघांच्याही घरच्यांकडूनही ग्रीन सीग्नल मिळाल्याने लग्नाची तयारी सुरू झाली आहे. वेडिंग प्लानही तयार आहे. अथिया व केएल साऊथ इंडियन पद्धतीने लग्न करू शकतात. अर्थात अद्याप अथिया व केएल यांनी या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.
नुकताच के एल राहुलचा वाढदिवस झाला. या दिवसाचं निमित्त साधत अथिया शेट्टीनं के एल राहुलसोबतचे काही रोमॅन्टिक फोटो शेअर केले होते. विशेष म्हणजे, तिच्या या फोटोंवर कमेंट करत के. एल. राहुलनं ‘लव्ह यू’ अशी कमेंट करत प्रेमाची जाहिर कबुलीच दिली होती.
त्याआधी अथियाच्या वाढदिवसाला म्हणजेच, गेल्या 5 नोव्हेंबरला के.एल.राहुलने तिला विश करत, तिच्यासोबतचा सुंदर फोटो पोस्ट केला होता. हॅपी बर्थ डे माय हार्ट, असं लिहित त्यानं अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यांनतर दोघेही सतत एकेमकांसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून आले आहेत. आथिया केएलसोबत अनेक सामन्यांसाठी विदेश दौरा करत असते.