झीनत अमान यांच्या ओठावर Kiss करणं या अभिनेत्याला पडलं होतं महागात, सिनेमा बॅन करण्याची झालेली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 19:36 IST2025-04-09T19:35:43+5:302025-04-09T19:36:12+5:30
Zeenat Aman: झीनत अमान यांनी शशी कपूर, देव आनंद, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. एवढेच नाही तर बॉलिवूडमध्ये बोल्डनेसचा ट्रेंड झीनत यांच्यापासून सुरू झाला आणि जुन्या काळातही त्या पडद्यावर किसिंग सीन देण्यास मागेपुढे पाहत नव्हत्या.

झीनत अमान यांच्या ओठावर Kiss करणं या अभिनेत्याला पडलं होतं महागात, सिनेमा बॅन करण्याची झालेली मागणी
झीनत अमान (Zeenat Aman) एकेकाळच्या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या ५ दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत, झीनत यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या काळात त्यांनी शशी कपूर, देव आनंद, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. एवढेच नाही तर बॉलिवूडमध्ये बोल्डनेसचा ट्रेंड झीनत यांच्यापासून सुरू झाला आणि जुन्या काळातही त्या पडद्यावर किसिंग सीन देण्यास मागेपुढे पाहत नव्हत्या.
आज आम्ही तुम्हाला झीनत अमान यांच्या अशाच एका लिपलॉक सीनबद्दल सांगणार आहोत, अभिनेत्रीला लिपलॉक केल्यानंतर अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या आणि त्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली होती. ७० ते ८० च्या दशकापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत रोमान्सची व्याख्या पूर्णपणे बदलली होती. पूर्वी चित्रपटांमध्ये किसिंग सीन दाखवण्यासाठी फुलं आणि हंसांच्या जोड्या वापरल्या जात असत, परंतु नंतर सहकलाकारांच्या परस्पर संमतीनंतर ते उघडपणे दाखवले जाऊ लागले.
सिनेमा बॅन करण्याची झालेली मागणी
झीनत अमान यांच्या पदार्पणानंतर त्यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये लिपलॉक सीन दिले. परंतु, १९७८ मध्ये रिलीज झालेल्या 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटात झीनत यांनी सुपरस्टार शशी कपूरसोबत दिलेल्या किसिंग सीनवरून बराच वाद झाला होता. हा चित्रपट हॉट सीन्सने भरलेला होता, ज्यामुळे दिग्दर्शक राज कपूर यांचा हा चित्रपट खूप चर्चेत आला होता. झीनत यांना अशा प्रकारे ओठांवर किस केल्याबद्दल शशी कपूर यांच्यावर बरीच टीका झाली होती. एवढेच नाही तर सत्यम शिवम सुंदरमवर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली. या चित्रपटात झीनत अमान यांचा अतिशय बोल्ड अंदाज पाहायला मिळाला, जो त्या काळातील प्रेक्षकांसाठी खूपच धक्कादायक होता. हे सर्व असूनही, झीनत आणि शशी यांचा हा चित्रपट हिट झाला आणि तो अजूनही एक कल्ट चित्रपट मानला जातो.
शशी कपूर व्यतिरिक्त या अभिनेत्यांसोबत दिलेले किसिंग सीन
फक्त शशी कपूरच नाही तर झीनत अमान यांनी त्यांच्या कारकिर्दीत हिंदी चित्रपटसृष्टीतील 'ही-मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज सुपरस्टार धर्मेंद्रसोबतही लिपलॉक सीन केले आहेत. या दोघांचा किसिंग सीन शालिमार चित्रपटात पाहायला मिळाला होता.