या अभिनेत्रींनी दुस-यांदा थाटला संसार, एकीने तर केली चार लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 08:00 IST2020-01-06T08:00:00+5:302020-01-06T08:00:02+5:30

खऱ्या आयुष्यात एक-दोन नाही तर तीन ते चार वेळा केलं लग्न...

kirron kher bindiya goswami yogita bali neelima azim are those bollywood actresses who married more than once | या अभिनेत्रींनी दुस-यांदा थाटला संसार, एकीने तर केली चार लग्न!!

या अभिनेत्रींनी दुस-यांदा थाटला संसार, एकीने तर केली चार लग्न!!

ठळक मुद्देबॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनीही दोनदा लग्न केल्याचे म्हटले जाते.

बॉलिवूडमध्ये नाते बनायला आणि ते तुटायला वेळ लागत नाही. त्यामुळे दुस-यांदा, तिस-यांदा लग्न ही बॉलिवूडमध्ये तशी नवी गोष्ट नाही. रिअल लाईफमध्ये दोनदा, तीनदा इतकेच नव्हे तर चारदा लग्न केलेले अनेकजण आहेत.  आज अशाच काही अभिनेत्रींबद्दल आम्ही सांगणार आहोत. 

जेबा बख्तियार

‘हिना’ हा चित्रपट पाहिला असेल तर यातला जेबाचा चेहरा तुम्हाला आठवत असेलच. ऋषी कपूरसोबतचा जेबाचा हा सिनेमा प्रचंड गाजला. याच जेबाने रिअल लाईफमध्ये एक नाही, दोन नाही तर चार लग्न केलीत. मुळची पाकिस्तानी असलेल्या जेबाने सलमान वलियानीसोबत पहिले लग्न के. यानंतर सिंगर अदनान सामीसोबत दुसरे लग्न केले. 1989 मध्ये अभिनेता जावेद जाफरीसोबत तिसºयांदा लग्नगाठ बांधली आणि चौथ्यांदा सोहेल लेगारीसोबत लग्न केले.  सध्या ती पाकिस्तानच्या टीव्ही शोमध्ये काम करते.

नीलिमा अजमी 

अभिनेत्री नीलिमा अजमी यांनी पहिले लग्न अभिनेते पंकज कपूर यांच्यासोबत झाले. मात्र १९८४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर नीलिमा यांनी अभिनेते राजेश खट्टर यांच्याशी लग्नगाठ बांधली. तुम्हाला ठाऊक असेलच की, शाहिद कपूर हा नीलिमा आणि पंकज यांचा मुलगा आहे. तर ईशान खट्टर हा नीलिमा आणि राजेश खट्टर यांचा मुलगा आहे. २००१ मध्ये नीलिमा आणि राजेश यांचा घटस्फोट झाला. यानंतर त्यांनी उस्ताद रजा अली खान यांच्याशी लग्न केले. आता त्या  त्यांच्यासोबतही राहत नसल्याचे कळते.

 किरण खेर  

 किरण खेर यांनीही दोनदा संसार थाटला.  मुंबईतील बिझनेसमॅन गौतम बेरीशी त्यांचे पहिले लग्न झाले. बॉलिवूड अभिनेता सिकंदर खेर हा गौतम आणि किरण यांचा मुलगा. विवाहित असूनही किरण खेर अनुपम खेर यांच्या प्रेमात पडल्या.   अखेर त्यांनी गौतम यांना घटस्फोट देऊन अनुपम यांच्याशी लग्न केले.

नीलम कोठारी

अभिनेत्री नीलम कोठारी हिने ब्रिटनमधील एका उद्योगपतीशी पहिला संसार थाटला. कालांतराने नीलमने पहिल्या पतीला घटस्फोट देऊन अभिनेता समीर सोनीशी दुसरे लग्न केले

 बिंदिया गोस्वामी


 

एकेकाळची गाजलेली अभिनेत्री बिंदिया गोस्वामीनेही दोनदा संसार थाटला. अभिनेता विनोद मेहराशी तिचे पहिले लग्न झाले. पण काहीच वर्षांत हा संसार मोडला. यानंतर  बिंदियाने दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांच्याशी लग्नगाठ बांधली.

 योगिता बाली 


 
प्रसिद्ध अभिनेत्री योगिता बाली यांचे पहिले लग्न किशोर कुमार यांच्याशी झाले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर योगिता यांनी अभिनेता मिथून चक्रवर्ती यांच्याशी दुसरे लग्न केले.

रेखा


  

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनीही दोनदा लग्न केल्याचे म्हटले जाते. त्यांचे पहिले लग्न अभिनेते विनोद मेहरा यांच्याशी झाल्याचे मानले जाते. पण रेखा यांनी हे लग्न झाल्याचे कधीच कबुल केले नाही. १९९० मध्ये रेखा यांनी व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले होते. पण लग्नाच्या वर्षभरानंतर मुकेश यांनी आत्महत्या केली होती.

 
 

Web Title: kirron kher bindiya goswami yogita bali neelima azim are those bollywood actresses who married more than once