King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:03 IST2025-11-02T12:00:51+5:302025-11-02T12:03:05+5:30
शाहरुख खानच्या किंग सिनेमाचा पहिला प्रोमो रिलीज झालाय. शाहरुखचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज बघायला मिळतोय

King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
आज शाहरुख खानचा ६० वा वाढदिवस. चाहते शाहरुखच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट बघत होते. इतकंच नव्हे काल रात्रीपासून शाहरुखच्या मन्नतबाहेर भारतीय नव्हे तर परदेशी चाहत्यांनीही हजेरी लावली होती. अशातच शाहरुखने त्याच्या चाहत्यांना खास सरप्राईज दिलंय. शाहरुखने त्याच्या वाढदिवशी त्याच्या आगामी 'किंग' सिनेमाचा पहिला प्रोमो रिलीज केला आहे. हा प्रोमो इतका जबरदस्त आहे, की शाहरुखच्या चाहत्यांंनी काहीच मिनिटात या प्रोमोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
'किंग'च्या पहिल्या प्रोमोत काय?
'किती खून केले, आठवत नाही! लोक चांगले होते का वाईट, माहित नाही! पण त्यांच्या डोळ्यात दिसलं की, त्यांचा हा अखेरचा श्वास आहे. आणि मी त्यामागचं कारण. जगाने मला एकच नाव दिलं ते म्हणजे किंग', असा भन्नाट डायलॉग असलेला 'किंग' सिनेमाचा पहिला प्रोमो आऊट झालाय. 'डर नही दहशत हू', असा डायलॉग प्रोमोच्या शेवटी दिसतो. शाहरुख खानचा अॅक्शन अवतार आणि स्टायलिश लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. अल्पावधीत या टीझरवर प्रेक्षकांनी लाईक्स कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
कधी रिलीज होणार किंग?
'पठाण' फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने 'किंग'चं दिग्दर्शन केलंय. 'शाहरुख खानचा नवीन अनुभव', अशा टॅगलाईनखाली 'किंग'ची घोषणा करण्यात आलीये. हा सिनेमा पुढील वर्षी अर्थात २०२६ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजून या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली नाहीये. या सिनेमात शाहरुखसोबत त्याची लेक सुहाना खान याशिवाय अर्शद वारसी, जयदीप अहलावत दिसणार आहेत. इतकंच नव्हे अभिनेत्री दीपिका पादुकोण सुद्धा खास भूमिका करण्याची शक्यता आहे.