किंग खाननं सहकुटुंब पूजा करून घेतलं बाप्पाचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 17:51 IST2023-09-20T17:50:35+5:302023-09-20T17:51:42+5:30

किंग शाहरुख खान कुटुंबासह मुकेश अंबानींच्या घरातील गणेश पूजेसाठी पोहोचला. 

King Khan took darshan of Bappa, video went viral | किंग खाननं सहकुटुंब पूजा करून घेतलं बाप्पाचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल

Shahrukh Khan

सर्वसामान्यच नाही तर, सेलिब्रिटी देखील गणेशोत्सवाचा आनंद घेत आहेत.  दरवर्षीप्रमाणे याही वेळी गणेश चतुर्थीला मुकेश  प्रसिद्ध उद्योगपती अंबानी यांच्या घरी भव्य गणेश पूजेचे आयोजन करण्यात आले होते. अंबानींच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी केवळ बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर अनेक बडे राजकारणी आणि क्रिकेटर्सनी हजेरी लावली. यावेळी किंग शाहरुख खानही कुटुंबासह मुकेश अंबानींच्या पूजेसाठी पोहोचला. 

मुकेश अंबानी यांच्या गणेश पूजा कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत शाहरुख खान हा गणपती बाप्पाची पूजा करून मनोभावे दर्शन घेताना देखील दिसत आहे. यावेळी शाहरूखने वाईन रंगाचा सुंदर कुर्ती परिधान केला होता.  शाहरुख खानसोबत त्याची मुलगी सुहाना खान, पत्नी गौरी खानही आणि धाकटा मुलगा अबराम खानही दिसला. 

शिवाय, शाहरुख खानच्या घरी म्हणजेच ‘मन्नत’मध्ये गणराय विराजमान झालेत.  खुद्द किंग खानने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. शाहरुख कॅप्शनमध्ये म्हणाला, ‘गणपती बाप्पा तुमचं घरात स्वागत आहे… तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा… गणपती आपल्या सर्वांना सदैव सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अनेक मोदक खायला देवो…’.

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी किंग खानचा शाहरुखचा जवान हा प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही मिळाला. पठाणनंतर शाहरुखचा हा दुसरा प्रोजेक्ट चाहत्यांच्या भेटीला आला आहे. याच वर्षी जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण प्रदर्शित झाला होता. त्यानं देखील हजार कोटींची कमाई केली होती.

शाहरुख खानच्या जवान सिनेमाने बॉक्स ऑफीसवर जगभरातुन ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. शाहरुख खानच्या जवानने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. शिवाय, आता ‘डंकी’ या चित्रपटात शाहरूख खान दमदार अभिनय करताना दिसणार आहे.

Web Title: King Khan took darshan of Bappa, video went viral