हातात हात घालून फिरताना दिसले किम शर्मा व हर्षवर्धन राणे!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 21:11 IST2018-09-06T21:09:54+5:302018-09-06T21:11:36+5:30
‘मोहब्बतें’मधून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात करणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात बॉलिवूडच्या एका हँडसम हिरोची एन्ट्री झाली आहे. आम्ही बोलतोय, ते किम शर्माबद्दल.

हातात हात घालून फिरताना दिसले किम शर्मा व हर्षवर्धन राणे!!
बॉलिवूडमध्ये अफेअरच्या बातम्या वेगाने पसरतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या अफेअरची चर्चा आहे. ‘मोहब्बतें’मधून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात करणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात बॉलिवूडच्या एका हँडसम हिरोची एन्ट्री झाली आहे. आम्ही बोलतोय, ते किम शर्माबद्दल. होय, खरे सांगायचे तर काहीच दिवसांपूर्वी किम शर्माचे नाव नामांकित फॅशन डिझाईनर अर्जुन खन्नासोबत जोडले गेले होते. दोघांनी आपले फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. पण लवकरच त्यांच्या ब्रेकअप झाले़ किमच्या आयुष्यातून अर्जुन खन्ना गेला आणि हर्षवर्धन राणे आला.
होय, किम शर्मा आणि हर्षवर्धन राणे एकमेकांना डेट करत असल्याचे कळतेय. काही दिवसांपूर्वी एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून हे दोघेही भेटले आणि मग गाठीभेटी वाढल्यावर त्यांच्याबद्दल भलतीच चर्चा रंगली. गत एप्रिलमध्ये नंदिता महतानीच्या फॅशन शोमध्ये हे कथित कपल पहिल्यांदा एकत्र दिसले आणि आता हे जोडपे मुंबईत बिनधास्त फिरताना दिसते. काही दिवसांपूर्वी किमला भेटण्यासाठी हर्षवर्धन अंधेरी ते वांद्रे असा बाईक प्रवास करत आला होता. जेणेकरून तो ट्रॅफिकमध्ये अडकू नये. आता या दोघांना जुहूत एकत्र पाहिले गेले़ तेही एकमेकांच्या हातात हात घालूऩ मीडिया समोर पाहून दोघेही काहीक्षण गोंधळलेत. हर्षवर्धन तर आपल्या फोनमध्ये बिझी होता. पण किमला मीडियापुढे कसे रिअॅक्ट व्हावे, तेच कळले नाही.
किमचे नाव अनेक व्यक्तींशी जोडण्यात आले आहे. क्रिकेटर युवराज सिंग नंतर किम शर्मा स्पॅनिश बॉयफ्रेन्ड कार्लोस मार्टिनला डेट करत होती. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर काय झाले हे कुणालाच कळले नाही. अचानक किमने अली पुंजानीसोबत लग्न केले. केवळ एक आठवड्याच्या डेटींगनंतर किम आणि अली यांनी २०१० मध्ये लग्न केले होते. यानंतर किमने मुंबईसोडून केन्याला तिच्या पतीसोबत राहायला गेली होती़ पण पुढे त्यांचा घटस्फोट झाला़